कोल्हापूरचे राजकीय(political isuee) विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघातून कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (28 ऑक्टोबर) विराट शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. कागलच्या रणांगणामध्ये यंदा तुल्यबळ लढत होत आहे.
हसन मुश्रीफ(political isuee) यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी थेट भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनाच गळाला लावत मुश्रीफ यांच्या विरोधात उतरवलं आहे. त्यामुळे कागलची लढाई टोकाला जाऊन पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
मला एक लाखाचं मताधिक्य आवश्यक आहे. हाडाची काडं करा, पै पाहुण्यांच्या भेटीगाठी घ्या, मात्र गाफील राहू नका. आपण गाफील राहिलो तर घरात जास्त उंदीर फिरतात असा टोला सुद्धा हसन मुश्रीफ यांनी लगावला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधित केलं. महायुतीचे सरकार येणार असल्याचा दावा करत मी मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो असे ते म्हणाले. आपण आजपर्यंत इतकं वैद्यकीय क्षेत्रात काम केलं आहे की देशांमधील कोणत्याही नेत्यानं एवढं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलं नसल्याचे ते म्हणाले. मुश्रीफ पुढे म्हणाले की आतापर्यंत राजकारणात मी इतकी गर्दी पाहिली नव्हती. जवळपास एक लाख लोक या शक्तीप्रदर्शनाला उपस्थित आहेत. पुन्हा संधी दिल्यास मी तुमचा हमाल म्हणून काम करेन असेही ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, 25 वर्षे मला प्रतिनिधित्व करण्यास संधी दिली. तुम मुझे 18 दिन दे दो, मै तुम्हे दिल दूंगा असेही ते म्हणाले. मी पुन्हा निवडून आल्यास मुख्यमंत्री नाही पण उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो. मी अल्पसंख्याक असल्याने मला चांगली मला संधी मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. इतर राज्यांमध्ये तीन-तीन उपमुख्यमंत्री होतात तर आपल्या राज्यात का होऊ शकत नाही? अशी सुद्धा विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, इतकं सगळं मला मिळणार असेल तर जो ग्रामपंचायत सदस्य झाला नाही त्याला मत देऊन वाया घालवू नका.
हेही वाचा :
टीम इंडियाचा हेड कोच बदलला, ‘या’ माजी क्रिकेटरवर सोपवली जबाबदारी
स्विस कंपन्या भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; 10 लाख लोकांना मिळणार रोजगार!
भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार?; शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का