मी शहीद होण्यास तयार; मनोज जरांगेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षण(reservation) प्रलंबित आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण(reservation) द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. आरक्षणाच्या निर्णयामुळे फेब्रुवारी महिन्यापासून समाजाला वाट पाहावी लागली आहे. तसेच राज्य सरकारने कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या एक दिवसाअगोदर म्हणजेच 16 सप्टेंबर 2024 पासून उपोषणाची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत अंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी घडल्या असल्याचे चित्र समोर आले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. तसेच धनंजय मुंडे हे देखील अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी अचानक उपोषणाचे हत्यार उपसले हे समोर आले आहे.

यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील तरुणांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलण्याचे आवाहन देखील केलं आहे. कोणत्याही कारणामुळे आत्महत्या बोलकूल करु नका, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले आहे. तसेच तरुणांनी संयम ठेवावा.

याशिवाय लवकरच आरक्षणाचा प्रश्न सुटण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणासाठी मी मरायला देखील तयार आहे, काही आमदार माझे तुकडे करणार असे देखील ते म्हटले, तसेच मी शहीद होण्यास देखील तयार आहे असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा:

टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरची आता फुटबॉलमध्ये एंट्री

शिंदे गट, अजित पवारांचा सुपडा साफ होणार? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

शिंदेंची लेक होणार, गांधी घराण्याची सून? राहुल गांधी-प्रणिती शिंदेंच्या लग्नाच्या चर्चा थांबता थांबेनात