“मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या भाषणामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात(political updates) चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत आदर व्यक्त करत त्यांना ‘दैवत’ संबोधले, मात्र त्याचवेळी निर्णयक्षमतेवर अप्रत्यक्ष टीकाही केली. “मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत,” असे म्हणत त्यांनी थेट एक टोला लगावला.

    अजित पवार (political updates)म्हणाले की, नेतृत्व करताना स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे. निर्णय घेण्यासाठी ठामपणा असावा लागतो. यावेळी त्यांनी अण्णा बनसोडे यांचे कौतुक करत त्यांच्या संघर्षमय राजकीय प्रवासाची आठवण करून दिली. गरीब घरातून आलेले अण्णा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांच्या सहकार्याने विधानसभेचे उपाध्यक्ष बनवले, हे अधोरेखित केले.

    अजित पवार यांनी यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “माझ्या हातात हे शहर होतं. मी महापौर, विरोधी पक्षनेते यांच्या नियुक्त्यांपासून अनेक निर्णय घेतले. कधीही स्वार्थ पाहिला नाही. जनतेच्या विकासासाठीच काम केलं.” नदी प्रदूषण आणि कचऱ्याचा प्रश्नही त्यांनी अधोरेखित केला. काही नागरिकांच्या सूचनांत तथ्य असेल तर निर्णयांमध्ये बदल करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

    याशिवाय, भाषणादरम्यान अजित पवार यांचा मिष्कील स्वभावही पुन्हा एकदा पाहायला मिळाला. “लोकसंख्या वाढायला वेळ लागत नाही. लोकांनी मनावर घेतलं की ती झपाट्याने वाढते,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना हसवलं.

    जागतिक स्तरावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाबाबतही त्यांनी भाष्य केले आणि कोविडनंतरच्या या आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन केले.

    हेही वाचा :

    ‘या’ अभिनेत्रीने नाकारली ६०० कोटींची संपत्ती; लग्नापूर्वी झाली ३४ मुलांची आई

    इचलकरंजीत नवकार महामंत्र महाजपास हजारोंचा प्रतिसाद

    बाप की हैवान? पोटच्या १६ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; गरोदर झाल्यावर…