मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार(politics) यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार, असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार(politics) यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे, असं साकडं पांडुरंगाला घातलं आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ बोलत होते. यावर बोलताना त्यांनी शरद पवारांवर असलेलं प्रेम व्यक्त केलंय.
बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील. तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील, असं सांगतानाच आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार, असं झिरवाळ यांनी म्हटलंय.
माझी मागणी एकच आहे. प्रत्येक माणूस तीच मागणी करतोय, विरोदक असो की राष्ट्रवादीचा कुणीही माणूस असो. सगळ्यांना वाटतंय की अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले पाहिजे. राजकारणात काही गोष्ट घडून गेली. आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो. मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिलं, असंही नरहरी झिरवाळ म्हणाले.
मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलो नाही. कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाऊ? मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळचं स्थान देतो. प्रभू रामचंद्राच नाव घेऊन मी साहेबांना फसवलं. मला हा निर्णय घ्यायला भाग पडलं, याच मूल्यांकन मीच करू शकतो, असंही झिरवाळांनी सांगितलं.
हेही वाचा :
अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला सर्वात मोठा निर्णय
धनंजय मुंडेंचा पक्षातूनच गेम होतोय ?; पालकमंत्रीपद लांबच राहिलं आता मंत्रिपदही जाणार?
हॉर्न वाजवल्याने गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरला शिवीगाळ, तुफान राडा; दुकानांची जाळपोळ