मुलाकडच्या मंडळींनी लग्न मोडल्यामुळे तरूणीने (committed)गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील जामखेड पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. तरूणाच्या कुटुंबाने आणि तरूणाने ‘आपली जोडी शोभत नाही’ या कारणास्तव लग्न मोडले. लग्न मोडल्याने तरूणीला मानसिक तणाव आला. याच तणावाखाली तरूणीने टोकाचे पाऊल उचलले. तिने गळफास घेत आयुष्य संपवले. या प्रकरणी मुलासह आई- वडिलांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

मोनिका सुरवसे हिचं लग्न महेश मेंगडे याच्याशी जमलं होतं. मात्र, लग्न जमल्यानंतर, ‘तू मला आवडली नाही. मला तू शोभत नाही’, असे म्हणत महेशने मोनिकाचा अपमान केला आणि लग्न मोडले. तसेच तरूणाची आई अनुजा दत्तात्रय मेंगडे आणि वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे यांनी तरूणीचा (committed)अपमान केला होता. ‘तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभून दिसत नाही’, असं म्हणत त्यांनी तरूणीचा अपमान केला.
मुलीने उचलले टोकाचे पाऊल
लग्न मोडल्यानंतर तरूणीने मानसिक त्रास झाला.याच त्रासामुळे तरूणीने डिसलेवाडी येथील राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. तिने घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलीने गळफास घेतल्यानंतर तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी तरूणासह त्याच्या आई वडिलांवर आत्महत्येस (committed) प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनवलकर करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणीच्या 2100 रुपयांबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर!
गर्ल्स हॉस्टेलला लागली आग, तरुणींनी चक्क दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; थरारक घटनेचा Video Viral
जिथे नीती मूल्ये कमी पडतात तिथेच क्रूर गुन्हे घडतात!
हातावर मेहंदी, साखरपुड्यासाठी पाहुणे जमले पण नवरदेवाच्या अंत्ययात्रेला जाण्याची वेळ