इंदापूर : विधानसभा निवडणुकीच्या(political articles) तोंडावर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मोठं इनकमिंग सुरु आहे. आज भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
तर तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार(political articles) गटाकडून मोठं गिफ्ट मिळाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत सुतोवाच केले आहे. तसेच पवार यांनी मोठा गौप्यस्फोेटही यावेळी केला आहे.
इंदापूरच्या कार्यक्रमाला निघण्यापूर्वीच कुठूनतरी फोन आला. म्हणाले 14 तारखेला आमच्याकडे यावेच लागतंय. मी म्हणालो काय कार्यक्रम आहे, ते म्हणाले इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच आमच्याकडे आहे. मी म्हटलं कुठं, ते म्हणाले फलटणला… असे म्हणत शरद पवारांनी फलटणमधील रामराजे निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश कार्यक्रमाचे संकेतच दिले आहेत.
तसेच, आता, याच्यानंतर फलटण, आणि फलटणनंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस बुक झाले आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी पक्षाकडे येणाऱ्या इच्छुकांची व उमेदवारांची गर्दी वाढत असल्याचे स्पष्ट केले.
“तुम्हा सगळ्यांच्या मनात काही गोष्टींबाबत स्पष्टता आहे की नाही हे मला काही कळलेलं नाही. काहीही काम द्यावं, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. काहीही काम करायचं असतं, तर त्यासाठी तुमची काय गरज आहे? कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल तर अशी कामं हर्षवर्धनकडे द्यायची. ती द्यायची असेल, तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा”, असं शरद पवार उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले.
हेही वाचा:
दसऱ्याला भन्नाट फीचर्ससह खरेदी करा ‘ही’ बाईक
शिवस्मारकाच्या शोधात संभाजी राजे छत्रपती…!
राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर चार दिवसातच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापुरात