राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रर्श्वभूमीवर राजकीय वातावरण(political news today) तापण्यास सुरूवात झाली आहे. या दरम्यान शिवसेनेच्या आमदाराने केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. माझी हत्या झाली तरी चालेल, पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही, अशी पोस्ट शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
किणीकरांनी लिहीलेल्या पोस्टमध्ये, “अंबरनाथमधील काही समाजकंटक पक्षाच्या व मुख्यमंत्री एकानाथ शिंदे(political news today) साहेबांच्या तसेच अंबरनाथमध्ये होणाऱ्या विकास कामांच्या विरोधात काम करत आहेत. पण माझी हत्या झाली तरी चालेल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही व अंबरानथ शहराचा सर्वांगीण विकास कधीच थांबू देणार नाही” असं वक्तव्य केलं आहे.
दरम्यान अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदाद डॉ. बालाजी किणीकर यांनी या पोस्टमध्ये केलेले आरोप कोणावर केलेत याबद्दल अद्याप स्पष्टता नाहीये. त्यामुळे अंबरनाथमधील ते समाजकंटक नेमके कोण आहेत? याबद्दल राजकीय वर्तुळात तर्क लावले जात आहेत. आमदार किणीकरांचा रोख त्यांच्याच स्व:पक्षातील कोणत्या नेत्याकडे आहे का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
बालाजी किणीकर हे ठाण्यातील अंबरनाथ येथील आमदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या रोहित साळवे यांचा पराभव केला होता. तसेच त्यापूर्वी २००९ आणि २०१९ मध्ये देखील ते विधानसभा निवडणूकीत निवडून येत आमदार झाले होते. सलग तिसरी टर्म आमदार किणीकर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच महाविकास आघाडीतून बाहेर पडले.
हेही वाचा :
शाहरुखच्या उपचारात मुंबईत हयगय? तातडीने अमेरिकेला रवाना
ऑगस्ट महिना 3 राशींना करणार मालामाल; नोकरी-व्यवसायात मिळणार यशच यश
चुकीला माफी नाही! संजू सॅमसनसह ‘या’ खेळाडूंसाठी सूर्या घेणार ‘गंभीर’ निर्णय