लहानपणीचं प्रेम आठवलं, इन्स्टावर एक्स गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट पाठवली; नव्या बॉयफ्रेंडचा पारा चढला, अन्…

अहमदाबाद: किशोरवयीन प्रेमाच्या(love) आठवणी विसरता येत नाहीत, असे म्हणतात. मात्र, याच जुन्या प्रेमाच्या आठवणींमुळे एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या रामेल भागात हा प्रकार घडला असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

प्रकरणाचा खुलासा

गोमतीपूर पोलिसांच्या माहितीनुसार, जैनिश नावाच्या तरुणाने काही दिवसांपूर्वी आपल्या शालेय जीवनातील मैत्रिणीला, जी आता त्याची एक्स-गर्लफ्रेंड(love) आहे, इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र, सद्यस्थितीत ती मंथन परमारची प्रेयसी असल्याने मंथनला संताप अनावर झाला. याआधीही जैनिश आणि मंथन यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे.

प्राणघातक हल्ल्याचा कट

मंथनच्या दोन मित्रांना पैशाची गरज होती. त्यामुळे तिघांनी मिळून जैनिशला लुटण्याचा आणि त्याचा खून करण्याचा कट रचला. ८ जानेवारी रोजी जैनिशला भेटायला बोलावून तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. गंभीर मारहाणी नंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांनी आरोपींना अटक केली

गुप्त माहितीच्या आधारे गोमतीपूर पोलिसांनी नागोरीजवळ नंबर प्लेटशिवाय असलेल्या टीव्हीएस दुचाकीला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान हल्ल्याचा उलगडा झाला आणि पोलिसांनी मंथन परमार व त्याच्या दोन मित्रांना अटक केली.

या घटनेमुळे अहमदाबाद शहरात एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा :

11 दिवसांनंतरही शिवसेना पदाधिकारी गायब; धक्कादायक माहिती समोर

‘शिवाजी महाराज लाच देऊन सुटले…’; मराठी अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय; शिक्षण मंडळाने उचललं मोठं पाऊल