‘मी त्यांच्यासोबत एकाच बेडवर…’; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

मनोरंजन उद्योगातील लोकप्रिय अभिनेता(actor) आमिर अलीने आपल्या आयुष्याशी संबंधित एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्याला शारीरिक छळाचा सामना करावा लागला होता. हा अनुभव त्याने एका मुलाखतीत शेअर केला, ज्याने संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला धक्का दिला आहे.

आमिर अलीने(actor) सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा ट्रेनमध्ये प्रवास केला, तेव्हा त्याला अनवधानाने स्पर्श केला गेला, जो त्याला अत्यंत घृणास्पद वाटला. त्यानंतर त्याने ट्रेनने प्रवास करणेच बंद केले. कारण मला नको तसा स्पर्श केला जात होता. मी त्यावेळी 14 वर्षाचा होतो. मी माझी बॅग माझ्या पाठीजवळ ठेवायला सुरुवात केली.”

आपल्या मित्रांबद्दल बोलताना सांगितले की, “माझे काही मित्र गे आहेत. मी त्यांना खूप चांगलं ओळखतो. ते मला माझ्या भावासारखे आहेत. मी त्यांच्याबरोबर एकाच बेडवर झोपलो आहे.” पण 14 वर्षांचा असताना त्याच्यासोबत झालेल्या शारीरिक छळाच्या घटनेने त्याचा मानसिकतेवर मोठा परिणाम केला होता.

आमिर अलीने एक नवीन खुलासा केला आहे की, तो सध्या अभिनेत्री अंकिता कुकरेतीला डेट करत आहे. याआधी आमिरने २०१२ मध्ये अभिनेत्री संजीदा शेखसोबत विवाह केला होता. त्यांना एक मुलगी आहे, ज्याचे नाव आयरा आहे. मात्र, ९ वर्षांच्या संसारानंतर, दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

आमिर अलीचा हा अनुभव अनेक लोकांसाठी धक्का देणारा आहे, विशेषतः एक यशस्वी अभिनेता ज्या अनुभवातून गेला, तो या इंडस्ट्रीतील इतर कलाकारांसाठीही प्रेरणादायक ठरू शकतो. आमिर अली २० वर्षांहून अधिक काळ भारतीय टीव्ही जगात सक्रिय आहे. त्याने कहाणी घर घर की, वो रहने वाली महलों की, आणि क्या दिल में है यांसारख्या प्रमुख टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म

मेट्रोत बसल्यावर डुलक्या खात होता, सुंदर मुलीनं जवळ येऊन असं काही केलं की मुलाची झोप उडाली VIDEO

शरद पवार-अजित पवार पुन्हा एकत्र येणार..! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण