‘मी याबाबत त्यांच्याशी बोललो….’ उद्धव – राज ठाकरे एकत्र येण्यावर शरद पवार काय म्हणाले?

राजकीय वर्तुळात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे (political updates)एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांचा हा कौटुंबिक प्रश्न आहे, याची मला माहिती नाही. मी याबाबत त्यांच्याशी बोललो नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कसं बोलणार? अशी तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे.

राजकीय वर्तुळात पवार कुटुंब एकत्र येणार, अशी देखील चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार म्हणाले की, जनतेच्या कामानिमित्ताने एकत्र आलो होतो. सरकारच्या प्रतिनिधीशी बोलणं यामध्ये काही चुकीचं नाही. तर ठाकरे कुटुंबाची राजकीय समीकरणं बदलणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी देखील यावर भाष्य केलंय. हा राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांचा कौंटूंबिक प्रश्न आहे. यासंदर्भात कल्पना नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.

एआयवर बोलताना शरद पवार(political updates) यांनी म्हटलं की, देशभर राबवले जात ही वस्तुस्थिती नाही. काल सकाळी समूहाचे प्रतापराव पवार यांनी कृषी मंत्री यांना तंत्रज्ञान देशभरामध्ये राबवावं, असं सांगितलं आहे. त्याची सुरुवात आम्ही बारामतीमधून केली आहे. हे तंत्रज्ञान अनेक गोष्टीसाठी उपयोगी आहे. आरोग्य, फायनान्स, इंजीनियरिंग, परंतु जास्त प्रमाणात इंटीयन्स हे कृषी क्षेत्रात आहे. याची आम्ही सुरुवात उसापासून केली आहे.

राज्याच्या वतीने हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अजून पाच पिके घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे, याचा फायदा राज्यामध्ये होईल. पाणीटंचाईवर बोलताना शरद पवार म्हणाले की, काळजी करण्याचे कारण नाही. याअगोदर देखील अशा पद्धतीने पाणीटंचाई झालेली होती. शेतकरी देखील पाण्याचा जपून वापर करतील. मे आणि जून महिना काढायचा आहे, यातून मार्ग काढत आपण बाहेर जाऊ, असं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

LPG गॅस सिलेंडरसाठी नवीन योजना लागू, जाणून घ्या बुकिंगसाठीचा नवा नियम

प्रसिद्ध अभिनेत्रीनं गर्लफ्रेंडसोबतच गुपचूप बांधली लग्नगाठ

‘रात्रीचे 9 वाजले आहेत, तुझ्या गर्लफ्रेंडला…,’ संतापलेल्या युवराजने अभिषेक शर्माला रुममध्ये लॉक केलं