‘बीडच्या तुरुंगात असताना मी माझ्या नवऱ्यासोबत…’; करूणा मुंडेचा मोठा दावा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी, वाल्मीक कराड तुरुंगातून (activist)व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांशी बोलत असल्याचा आरोप केला आहे. कराड तुरुंगात चहा-नाश्ता करत असल्याचा दावा करत, दमानिया यांनी कराडला मिळणाऱ्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या आरोपांना करुणा शर्मा यांनी पाठिंबा दिला आहे.

करुणा शर्मा काय म्हणाल्या?
“अंजली दमानिया यांचे आरोप खरे आहेत. मी स्वतः बीड जेलमध्ये १६ दिवस राहिले आहे, त्यामुळे दमानिया जे म्हणत आहेत, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे,” असे करुणा शर्मा यांनी सांगितले.“मी १६ दिवस बीडच्या तुरुंगात होते. माझा नवरा माझ्यासोबत अर्धा-अर्धा तास बोलायचा. मी सहा दिवस अन्न(activist) खाल्ले नव्हते, फक्त एका सफरचंदावर होते. तरीही, मला जेलमध्ये चांगल्या हॉटेलमधून जेवण पाठवण्यात आले होते.”

“धनंजय मुंडे यांनी मला फोन करून सांगितले की, फाईव्ह स्टार हॉटेलमधून जेवण पाठवले आहे, ते खा. ते माझ्याशी अर्धा तास फोनवर बोलायचे.” “अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सुविधांबद्दल केलेला दावा १०० टक्के बरोबर आहे,” असेही करुणा शर्मा यांनी म्हटले.

करुणा शर्मा यांनी, “धनंजय मुंडेंसारखे लोक मंत्रालयात नकोत,” (activist)असे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंची सावली आहे. त्याच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळेच आज राजीनाम्याची मागणी केली जात आहे आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.

हेही वाचा :

‘पंकजा मुंडे माझ्या नवऱ्यामुळेच मंत्री बनू शकल्या’; करूणा शर्मांचं वक्तव्य चर्चेत

‘हॅप्पी हार्मोन्स’ कसे वाढवावेत?; जाणून घ्या सोपे मार्ग

खळबळजनक! प्रेमीयुगुलाची वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या