परिक्षेच्या ताणामुळे अनेक विद्यार्थी त्रस्त असतात, पण एका चिमुकल्याने त्याचा कंटाळा इतका व्यक्त केला की त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media)प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, हा चिमुकला मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतो, “मैं एक्झाम बॅन कर दूंगा!” त्याच्या बोलण्यातील निरागसता आणि आत्मविश्वास पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
व्हिडिओमध्ये तो शाळेतील परिक्षांविषयी त्याच्या मनातील भावना बोलून दाखवतो. परीक्षांना कंटाळलेला हा चिमुकला पुढे म्हणतो की, “जर माझ्या हातात असते तर मी सर्व परिक्षा बंद करून टाकल्या असत्या.” त्याचा हा तिरकस ह्यूमर आणि बोलण्याची पद्धत पाहून सोशल मीडियावर लोक हसताहेत आणि त्याच्या साहसाचे कौतुक करताहेत.
पालकांनीही या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. परीक्षांचा ताण हा एक मोठा विषय आहे, मात्र या चिमुकल्याच्या निरागस प्रतिक्रियेने या विषयाला हलकेफुलके रूप दिले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण त्यांच्या शाळेतील दिवसांची आठवण काढत आहेत आणि कसे तरी हसून त्याचा आनंद घेत आहेत.
तुम्हीही हा व्हिडिओ पाहून खळखळून हसाल!
हेही वाचा:
वडेट्टीवार यांच्याकडून अजित पवार यांची पाठराखण, म्हणाले “राज्याच्या विकासासाठी योग्य निर्णय”
महिलांनो घाई करा! ‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून अर्ज करण्याची पुन्हा सुवर्णसंधी
‘सिंघम अगेन’आधी अभिनेता रिलीज करणार ‘सिंघम’, या तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत