“मी निवडणूक लढवणार नाही… शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती?

महाराष्ट्राच्या राजकारणाशी(politics) संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत, या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत.वयाच्या ८४ व्या वर्षीही शरद पवार राजकारणात सक्रिय असताना पाहायला मिळत आहे, तरीही शरद पवारांनी असं का म्हटलं आहे?

यावेळी शरद पवार (politics)यांनी निवृत्तीचे संकेत देताना म्हटलं की, इशारा देत आता नव्या लोकांना निवडून द्यावे, असे म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी म्हटलं की, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या असंही यावेळी शरद पवारांनी म्हटलं आहे.

निवृत्तीचे संकेत देताना राष्ट्रवादीचे सपा अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आम्हाला कुठेतरी थांबावे लागेल, “मला आता कोणतीही निवडणूक लढवायची नाही. आता मला निवडणुका थांबवाव्या लागतील आणि नवीन लोकांना पुढे यावे लागेल.” मला जनतेची सेवा करायची आहे. सरकार आल्यास आम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

“मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या”.

या वर्षाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता आणि या वयात त्यांनी घरीच राहावे, ते कधी निवृत्त होतील हे माहीत नाही, असे म्हटले होते. यानंतर शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिले. “अजित पवार माझ्या वयाबाबत वारंवार विधाने करतात. माझ्या राज्यसभेच्या कार्यकाळात अजून वेळ आहे. तोपर्यंत मी सेवा करेन. त्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही.”

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर सर्व 288 जागांसाठी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या, शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. तर 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, शिवसेनेला 63 आणि काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या.

हेही वाचा :

कोल्हापूरच्या राजघराण्या कडून माघारीचे “गुढ” राजकारण!

याला म्हणतात जबरा फॅन! 95 दिवस मन्नत बाहेर थांबला, शाहरुखने दिलं खास सरप्राईज

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? सावधान! कर्करोग, हृदयविकार अन् रक्तदाबाला आमंत्रण,