‘एक दिवस उपाशी राहीन, पण सेक्स…’; समंथाचं उत्तर ऐकून सगळे शॉक

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री(Entertainment news) समांथा रूथ प्रभू आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या वैयक्तिक जीवनातही अनेक चढउतार पाहायला मिळाले आहेत.

प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन यांच्या घराण्यात सून म्हणून वावरताना आणि नागा चैतन्यसोबत वैवाहिक आयुष्य घालवताना तिने अनेक वेळा धाडसी मतं मांडली. असाच एक तिचा जुना मुलाखतीतील विधान सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे.

एका फोटोशूटदरम्यान पत्रकाराने समंथाला अत्यंत अनपेक्षित प्रश्न विचारला – “तुला जर एकच गोष्ट निवडायची असेल, जेवण की सेक्स?” यावर उत्तर देताना समंथाने कोणताही आडपडदा न ठेवता म्हटलं, “मी एक दिवस उपाशी राहीन, पण अन्नाऐवजी मी सेक्सची निवड करीन.” तिचं हे थेट आणि स्पष्ट उत्तर अनेकांसाठी धक्कादायक ठरलं. यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा भडीमार झाला. काहींनी तिच्या बोल्ड स्वभावाचं कौतुक केलं, तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली.

समांथाच्या(Entertainment news) या विधानावरून इंटरनेटवर गदारोळ उडाला. अनेकांनी तिला ट्रोल केलं, मात्र नेहमीप्रमाणेच समंथाने कोणत्याही नकारात्मक प्रतिक्रियांना भीक न घालता आपली भूमिका ठामपणे मांडली. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून, तिच्या पोस्ट्स, फोटोशूट्स आणि व्हिडीओजमुळे चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते.

तिच्या स्पष्ट बोलण्यामुळेच ती इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी ओळख निर्माण करते. अनेकदा वादग्रस्त विधानं करूनही तिने कधीच माघार घेतली नाही. समंथाचं हे विधानही तिच्या ठाम आणि बिनधास्त स्वभावाचं प्रतीक मानलं जात आहे.

हेही वाचा :

अखेर प्रशांत कोरटकर तुरूंगाबाहेर; कोल्हापूर पोलिस सीमेपर्यंत देणार सुरक्षा

महाराष्ट्रासाठी खुशखबर! लवकरच धावणार नवी सर्किट ट्रेन, फडणवीसांची मोठी घोषणा!

‘आज की रात’नंतर तमन्नाचा ‘नशा’मध्ये हॉट डान्सिंग मूव्हज, ‘रेड २’ मधील जबरदस्त गाणं रिलीज!