बॉलिवूड स्टारकिड्स पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान(comment) यांच्या नात्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगलेली असते. नुकतेच पलकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवर इब्राहिमने केलेल्या कमेंटमुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याविषयी चर्चांना उधाण आले आहे.
पलकने तिच्या कॅज्युअल लूकमधील फोटो शेअर(comment) करताच इब्राहिमने “लुकिंग गुड” अशी कमेंट केली. यावरून नेटकऱ्यांनी दोघांच्या नात्याबद्दल तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर “रिलेशनशिप कन्फर्म?” असा थेट सवाल केला आहे.
या फोटोंमध्ये पलकने हिरवा स्वेटशर्ट आणि राखाडी ट्रॅकपँट घातली आहे. फोटो पॅलेससारख्या दिसणाऱ्या एका टेरेसवर काढण्यात आले असून, मागील बाजूस निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. यामुळे एका नेटकऱ्याने “पटौदी पॅलेसमध्ये फोटो काढलेत का?” असा प्रश्नही विचारला आहे.
पलक आणि इब्राहिम अनेकदा एकत्र दिसून आले असले तरी, त्यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे काही सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याविषयी उत्सुकता आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजनेमुळे लाखों शेतकरींना मिळणार लाभ
संभाजी भिडे यांच्या ‘दळभद्री स्वातंत्र्य’ वक्तव्यावरून वादंग, विरोधकांची टीका
पंढरपूरमध्ये भाविकांसाठी अल्पदरात मिळणार भोजन: सेवेची नवीन पहाट