RCB च्या खेळाडूवर ICCची मोठी कारवाई; अंपायरला नडणं महागात पडलं”

क्रिकेटमध्ये सर्वच निर्णय आपल्या बाजूने लागत नाहीत. कधीकधी गोलंदाजांच्या बाजूने लागतात तर गोलंदाजांच्या विरोधात. त्यामुळे(match) गोलंदाज कधीकधी नाराज होतात. नाराज झाल्यानंतर काहींना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येते, तर काहींना नियंत्रण ठेवता येत नाही.

असंच काही, बांगलादेश आणि वेस्टइंडिज यांच्यात झालेल्या (match)सामन्यात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अल्झारी जोसेफने अंपायरसोबत पंगा घेतला. त्यामुळे त्याला मैदान सोडून जावं लागलं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

वेस्टइंडिज आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात जोसेफने चौथ्या अंपायरशी पंगा घेतला. अंपायरने त्याला स्पाईक्स घालून खेळपट्टीवर जाण्यापासून थांबवलं होतं. त्यानंतर जोसेफ अधिकाऱ्यांसोबत नको त्या शब्दात बोलताना दिसून आला. त्याने आचारसंहिता लेव्हल १ च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर मॅच फी च्या २५ टक्के दंड आकारण्यात आला आहे.

जोसेफने खेळाडू आणि सहकाऱ्यांसाठी बनवण्यात आलेल्या आचार सहिंतेच्या २.३ नियमाचे उल्लंघन केले आहे. त्याला १ डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. वनडे सामना सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने ही माहिती दिली.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेस्टइंडिजने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा डाव ४५.५ षटकात २२७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिजने ७ गडी राखून हे आव्हान पूर्ण केले.

यासह ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या डावातही वेस्टइंडिजने शानदार खेळ करुन दाखवला होता. पहिल्या सामन्यात वेस्टइंडिजने हा सामना जिंकला होता.

हेही वाचा :

भाजपने ‘EVM’मध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम; इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाणार

प्रसिद्ध हिरोईनच्या नवऱ्याचा ‘पुष्पा 2’वरुन अल्लू अर्जूनवर निशाणा…

टी 20 सीरिजसाठी टीम जाहीर, 6 खेळाडूंचं कमबॅक, कॅप्टन कोण?