आयसीसीने (ICC)नुकतीच जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मोठा धक्का बसला आहे. त्याची रँकिंग घसरून 6व्या स्थानावरून थेट 9व्या स्थानावर आली आहे.

दुसरीकडे, भारतीय फलंदाज विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांना मोठा फायदा झाला आहे.
विराट कोहलीने दोन स्थानांनी प्रगती करत 8व्या स्थानावर झेप घेतली आहे, तर यशस्वी जयस्वालने एक स्थान सुधारून 7व्या स्थानावर स्थान मिळवले आहे. कर्णधार रोहित शर्मा एका स्थानाने घसरून 6व्या स्थानावर आला आहे. जो रूटने अव्वल स्थान कायम ठेवले आहे, तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक तीन स्थानांनी पुढे जात चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन पहिल्या स्थानावर कायम आहे. जसप्रीत बुमराह तिसऱ्या आणि रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा आणि अश्विन पहिल्या दोन स्थानांवर आहेत, तर अक्षर पटेल सहाव्या स्थानावर आहे.
हेही वाचा:
दीपक केसरकरांवर संजय राऊतांचा घणाघात: “अफजलखानाची औलाद, बुटांनी मारले पाहिजे”
भीषण अपघातात आई-मुलगी जागीच ठार, चिमुकल्यासह तिघे गंभीर जखमी
भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची चिंताजनक वाढ; लोकसंख्या वाढीपेक्षा दुप्पट वेगाने वाढता आकडा