फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये झालेल्या एचएससी बोर्ड परिक्षेमध्ये (ielts exam) येथील डीकेटीई कॉमर्स कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यामध्ये इंग्लिश मेडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील अथर्व चौगुले याने 96 टक्के गुणांसह जिल्ह्यात व कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तर निकीता राठोड हिने 95 टक्के गुणांसह कॉलेजमध्ये द्वितीय, श्रवण पाटील याने 94.83 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या परीक्षेमध्ये प्रणव पवार याने अकौंटन्सी विषयात, तृप्ती बोहरा, तुषार कारंडे व यश निर्मळ यांनी माहिती तंत्रज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. तसेच अर्थशास्त्र विषयात श्रवण पाटील, निकीता राठोड व समीक्षा पाटील या विद्यार्थ्यांनी 98 गुण मिळवले. 14 विद्यार्थी 90 पेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजची अखंड यशाची परंपरा यंदाही अबाधित राहिली. त्यासाठी प्राचार्या सौ. भारती कासार, विभागप्रमुख जी. बी. खानाज व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, ट्रस्टी रवि आवाडे व सर्व संस्थेच्या संचालकांनी विद्यार्थ्याचे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा :
भाजप आमदार योगेश्वर यांना मुलीनेच दिली धमकी..
नदीत बुडालेल्या तरुणांचा शोधत गेलेल्या SDRF तीन जवान शहीद; थरारक Video ही आला समोर
‘पोलीस महानालायक असतात’,अभिनेत्री केतकी चितळेचा अपघातावर व्हिडीओ व्हायरल !