इचलकरंजी: गटारी अमावस्या निमित्त शहरातील कायदा व सुव्यवस्था(traffic) राखण्यासाठी इचलकरंजी शहर पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. अनुचित प्रकार घडू नयेत आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज शहराच्या प्रवेशद्वारांसह प्रमुख चौकांमध्ये पोलीस(traffic) तैनात आहेत. इचलकरंजीच्या चहूबाजूला नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, गटारी अमावस्या सणाच्या निमित्ताने अनेक लोक मद्यपान करतात आणि त्यामुळे रस्त्यांवर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. यामुळे शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. तसेच, वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी देखील आपल्या परिसरात सतत गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील जनतेने संयम बाळगावा आणि आपली सुरक्षितता लक्षात घेऊन वागावे, अशी सूचना पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा :
गटारीची पार्टी पडली महागात, कारसह पाच मित्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, अन् मग…
‘रुपानं देखणी, सुपारी चिकणी’; कोल्हापूरच्या वाघानं रशियन इरीनाला लावलं मराठीचं वेड
BCCI लवकरच भारतीय क्रिकेटपटूंना देणार मोठं गिफ्ट, जय शाह यांची मोठी घोषणा