धनादेश(check bounce) न वटताच परत आलेप्रकरणी सुरेश दादु कुंभार (रा. कबनूर) यास दोषी ठरवून इचलकरंजी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसो यांनी सहा महिने साधी कैद आणि १० लाख ११ हजार ६० रूपये इतकी नुकसान भरपाई व नुकसान भरपाई न दिलेस एक महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
सुरेश दादु कुंभार यांनी श्री. बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ५ लाख रूपये इतक्या कर्ज रकमेची उचल केली होती. या कर्ज रक्कमेच्या परतफेडीपोटी रकम रुपये ५ लाख ५ हजार ५३० रूपये इतक्या रकमेचा धनादेश दिला होता. मात्र सदरचा धनादेश न बटताच(check bounce) परत आल्याने सुरेश दादु कुंभार यांचेविरुद्ध न्यायालयात केस दाखल करण्यात आली होती.
याप्रकरणी सुनावणी होऊन व फिर्यादीच्या वतीने अॅड. राहुल मानसिंग महाजन यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. अॅड. महाजन यांना अॅड. सपना होगाडे व शिल्पा अंबीलडोके यांनी सहाय्य केले.
हेही वाचा :
दहावी-बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट
माझं काय, हा शेवटचा… रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ
मोदी सरकार होणार मालामाल! रिझर्व्ह बँकेकडून मिळणार 1 लाख कोटी