“इचलकरंजीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे आवाहन”

इचलकरंजी शहरवासीयांनी आपल्या घरगुती गणेश मूर्ती महापालिका निर्मित कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन कुंडात अथवा शहापूर खण येथे विसर्जित करून सहकार्य करावे: आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे.

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने घरगुती श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरातील शहापूर खण तसेच विविध ७१ ठिकाणी कृत्रिम गणेश विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत. यासाठी महानगरपालिकेने अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

सोमवार, ९ सप्टेंबर रोजी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत आयुक्तांनी गणेश मूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीला उपायुक्त सोमनाथ आढाव, सहा. आयुक्त विजय कावळे, रोशनी गोडे, केतन गुजर, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, विद्युत अभियंता संदीप जाधव, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, विजय पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेने शहरातील खालील ७१ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे:

1. महाराणा प्रताप चौक, वॉर्ड क्रमांक १ 

2. आंबी गल्ली, स्पुर्ती कॉर्नर, वॉर्ड क्रमांक १ 

3. मरगुबाई मंदिर, वॉर्ड क्रमांक २ 

4. शेळके मळा, एम.एस.ई.बी., वॉर्ड क्रमांक २ 

5. महासत्ता चौक, वॉर्ड क्रमांक ३ 

6. झेंडा चौक, वॉर्ड क्रमांक ३ 

7. पि.बा.पाटील मळा, वॉर्ड क्रमांक ३ 

8. नारायण चित्रमंदिर, वॉर्ड क्रमांक ४ 

9. महात्मा गांधी पुतळा, वॉर्ड क्रमांक ५ 

10. डी.वाय एस.पी. ऑफिस, चांदणी चौक, वॉर्ड क्रमांक ५ 

11. नाईक कॉर्नर जवळ, वॉर्ड क्रमांक ५ 

12. सोनपावली मंदिर, खंजीरे मळा, वॉर्ड क्रमांक ६ 

13. ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रिंग रोड, वॉर्ड क्रमांक ६ 

14. कॉ. के.एल. मलाबादे चौक, वॉर्ड क्रमांक ७ 

15. वेताळ पेठ मंदिर, वॉर्ड क्रमांक ७ 

16. भाग्यश्री कॉलनी, हनुमान मंदिर जवळ, वॉर्ड क्रमांक ७ 

17. शिव मंदिर समोर, मधुबन सोसायटी, वॉर्ड क्रमांक ८ 

18. पाटील मळा, बिग बाजार समोर, वॉर्ड क्रमांक ८ 

19. लाखे नगर, वॉर्ड क्रमांक ८ 

20. महासत्ता चौक, वॉर्ड क्रमांक ९ 

21. सांगली नाका, वॉर्ड क्रमांक ९ 

22. तोष्णीवाल गार्डन, आमराई रोड, वॉर्ड क्रमांक ९ 

23. बिग बाजार, वॉर्ड क्रमांक ८ 

24. सहकार नगर, वॉर्ड क्रमांक ९ 

25. बालाजी चौक, वॉर्ड क्रमांक १० 

26. थोरात चौक, वॉर्ड क्रमांक ११ 

27. राधाकृष्ण चौक, वॉर्ड क्रमांक ११ 

28. वीरशैव बँक, हुलगेश्वरी रोड, वॉर्ड क्रमांक १२ 

29. संभाजी चौक, वॉर्ड क्रमांक १२ 

30. हत्ती चौक, वॉर्ड क्रमांक १२ 

31. लिंबू चौक, वॉर्ड क्रमांक १३ 

32. वैरण बाजार, वॉर्ड क्रमांक १३ 

33. दुर्गामाता मंदिर, वॉर्ड क्रमांक १३ 

34. तांबे माळ शाळा, वॉर्ड क्रमांक १४ 

35. धर्मराज चौक, वॉर्ड क्रमांक १४ 

36. बंडगर माळ चौक, वॉर्ड क्रमांक १५ 

37. किसान चौक, वॉर्ड क्रमांक १५ 

38. अण्णा रामगोंडा भाजी मार्केट, वॉर्ड क्रमांक १६ 

39. तीन बत्ती चौक, वॉर्ड क्रमांक १६ 

40. षटकोन चौक, वॉर्ड क्रमांक १६ 

41. राजर्षी शाहू हायस्कूल, वॉर्ड क्रमांक १६ 

42. आय.जी.एम. हॉस्पिटल, वॉर्ड क्रमांक १६ 

43. हॉटेल अनुपम समोर, वॉर्ड क्रमांक १७ 

44. गंधर्व हॉटेल समोर, वॉर्ड क्रमांक १७ 

45. पंचवटी टॉकीज समोर, वॉर्ड क्रमांक १७ 

46. अटल बिहारी वाजपेयी चौक, वॉर्ड क्रमांक १८ 

47. बालाजी चौक, वॉर्ड क्रमांक १८ 

48. रेणुका नगर झोपडपट्टी, वॉर्ड क्रमांक १८ 

49. शिवतीर्थ परिसर, वॉर्ड क्रमांक १८ 

50. शिव मंदिर समोर, वॉर्ड क्रमांक १९ 

51. श्रद्धा कॉलनी, गणपती मंदिर, वॉर्ड क्रमांक १९ 

52. सरस्वती हायस्कूल, वॉर्ड क्रमांक २० 

53. साई मंदिर, वॉर्ड क्रमांक २० 

54. शिवा काशीद रोड, वॉर्ड क्रमांक २० 

55. मराठा चौक, वॉर्ड क्रमांक २१ 

56. मनेरे हायस्कूल, वॉर्ड क्रमांक २१ 

57. मारुती मंदिर, वॉर्ड क्रमांक २१ 

58. भारत माता हौसिंग सोसायटी, वॉर्ड क्रमांक २१ 

59. डेक्कन सिग्नल जवळ, वॉर्ड क्रमांक २२ 

60. गणेश नगर, गल्ली क्रमांक ४, वॉर्ड क्रमांक २२ 

61. विकास नगर, नागोरी किराणा स्टोअर्स जवळ, वॉर्ड क्रमांक २२ 

62. विकास नगर, फायर स्टेशन जवळ, वॉर्ड क्रमांक २२ 

63. गणपती मंदिर, जावईवाडी, वॉर्ड क्रमांक २३ 

64. सावली सोसायटी चौक, वॉर्ड क्रमांक २३ 

65. डोणपुडे घराजवळ, वॉर्ड क्रमांक २३ 

66. सोलगे मळा, वॉर्ड क्रमांक २४ 

67. भोई नगर, गेस्ट हाऊस समोर, वॉर्ड क्रमांक २४ 

68. दत्तनगर, रिक्षा स्टॉप, वॉर्ड क्रमांक २४ 

69. मलाबादे चौक, वॉर्ड क्रमांक २५ 

70. शहापूर गाव चावडी, वॉर्ड क्रमांक २५ 

71. तोरणा नगर, वॉर्ड क्रमांक २५ 

सर्व इचलकरंजी शहरवासीयांनी आपल्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन कुंडात किंवा शहापूर खण येथे करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.

हेही वाचा:

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना खोचक सल्ला: “पक्षाचं नाव शरद पवारांना द्या”

मांडीवर बसवून बळजबरी किस केले; दिग्दर्शकावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप

मेहुणीच्या खुनाच्या आरोपात आठ वर्षे कारागृहात असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका