इचलकरंजीत अटल महोत्सव: जनतेला कमी दरात खेळणी आणि आनंदाचा उत्सव

इचलकरंजी, 13 सप्टेंबर 2024 – इचलकरंजीतील गणेशोत्सवाला(festival) साजरा करण्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून खेळणी महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत, मात्र त्यांचे दर हे सामान्य नागरिकांच्या आवाक्यात नसल्याने अनेकांना त्यांचा पुरेपूर आनंद घेता येत नव्हता.

या परिस्थितीचा विचार करून, मागील वर्षी मा. आमदार श्री. सुरेशराव हाळवणकर आणि खासदार श्री. धैर्यशिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा आणि श्री. शुभम बरगे यांच्या नेतृत्वात सामान्य नागरिकांसाठी नामदेव मैदान येथे अटल महोत्सव (festival)आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील खेळणी आणि पाळने यांचे दर केवळ 20, 30, 40, 50 रुपयांच्या मध्यम वर्गासाठी परवडतील अशा किमतीत ठेवण्यात आले होते, ज्याचा इचलकरंजीच्या जनतेने मोठा लाभ घेतला.

या यशस्वी उपक्रमाच्या धरतीवर, यावर्षी पुन्हा शहराध्यक्ष अमृत मामा भोसले आणि युवा अध्यक्ष जयेश बुगड यांच्या नेतृत्वात नामदेव मैदानात अटल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीच्या महोत्सवात 6 मोठ्या प्रकारचे पाळने आणि 12 प्रकारची खेळणी उपलब्ध असणार आहेत, ज्यांची तिकीटे 20 ते 30 रुपयांमध्ये असतील. मोठ्या मोटर पाळण्यांचे दर केवळ 40 रुपये ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना परवडणारी आणि आनंददायक अनुभव घेता येणार आहे.

या महोत्सवातील आणखी एक विशेष बाब म्हणजे स्वच्छतेवर विशेष भर दिला गेला आहे. मैदानात उत्तम प्रतीचे मिनरल पाणी, स्वच्छ खाऊ स्टॉल्स आणि पुरुष-महिला सुरक्षारक्षकांची तैनाती करण्यात आली आहे. याशिवाय, पार्किंगसाठी कमी गर्दीची सोय आणि नागरिकांसाठी स्वतंत्र उभे राहण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महोत्सवाचे आयोजन भाजपा अटल महोत्सव आयोजक श्री. शुभम बरगे आणि संयोजक श्री. हेमंत वरुटे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे, तर सहसंयोजक म्हणून मनोज तराल, नामदेव सातपुते, आणि शुभम भाकडे कार्यरत आहेत.

इचलकरंजीच्या जनतेला उत्सवाचा आनंद कमी दरात मिळावा, यासाठी या महोत्सवाचे नियोजन अगदी सुटसुटीत पद्धतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा:

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹१५०० वाढवून ₹३००० होणार; राऊतांची मोठी घोषणा

रायगड: रोह्यातील साधना कंपनीत स्फोट; २ कामगारांचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी

राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहोत का? जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल