इचलकरंजी येथे विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

खड्डे काढण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून एका कामगाराचा मृत्यू(hire labor)झाला. संदीप सुरेश खपले (वय २५, रा. मूळ गाव उसनाळ, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. खपले खड्डे काढण्याचे काम करण्यासाठी सकाळी वखारभागातील कब्रस्तान येथे गेले होते. तिथेच महापालिकेच्या विद्युत खांबावरून खड्डे काढण्याच्या मशीनसाठी वीजपुरवठा घेतला.

मात्र विजेचा मेन स्विच सुरू करून वीज चोरीचा हा प्रकार कामगाराच्या(hire labor) अंगलट आला. यामध्ये खपले यांना विजेचा जोराचा धक्का बसला. जमिनीवर निपचित पडलेल्या खपले यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात आणण्यात आले.

मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.ही घटना वखारभागात कब्रस्तान येथे काल दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

हेही वाचा :

ब्रेकऐवजी दाबला एक्सलेटर, कारने तिघांना चिरडले

धोनी, विराट अन् रोहित एकत्र लागले नाचायला, पंत रिल शेअर करत म्हणाला…

CM शिंदेंच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप, सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप : Video