‘हिरो नसतो तर नक्कीच अंडरवर्ल्डमध्ये असतो’, स्वत:ला हिंसक म्हणत नानांनी सांगितले ते किस्से…

अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या रागीट स्वभावासाठी ओळखले जातात. ‘परिंदा’ आणि ‘खामोशी’ यांसारख्या चित्रपटांच्या सेटवर त्यांचे कलाकारांशी मोठे वाद झालेले. त्यासंदर्भातले किस्से बरेचदा चर्चेत सुद्धा आलेले. नुकतेच (hero)नाना पाटेकर यांनी स्वत:ला हिंसक प्रवृत्तीचा माणूस म्हटले. ते म्हणाले की, जर ते अभिनेता नसते तर कदाचित ते ‘अंडरवर्ल्डमध्ये’ असते अभिनयामुळे त्यांना त्यांच्या मनात दाबून ठेवलेल्या भावना बाहेर काढण्याची संधी मिळते असे देखील त्यांनी सांगितले.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखीत(hero) नाना म्हणाले, ‘लोक मला घाबरत होते. मी खूप हिंसक होतो. मी जास्त कोणाशी बोलायचो नाही, मी माझ्या फक्त कामाबद्दल सगळ्यांशी बोलायचो. पण मी आता कमी हिंसक झालो आहे मात्र जर आजही मला कोणी चिथावणी दिली तर मी त्याला चांगलीच मारहाण करेन. मी जर अभिनेता झालो नसतो तर अंडरवर्ल्डमध्येच गेलो असतो. हे मी अजिबात गंमतीत बोलत नाहीये. मी याबाबत खूप गंभीर आहे. अभिनयाने मला एक आऊटलेट दिला. माझ्यासाठी निराशा बाहेर काढण्याचा हा एक मार्ग बनला. मी खूप लोकांना मारहाण केली आहे. त्यापैकी अनेकांची नावे मला आठवत सुद्धा नाहीत. माझी खूप भांडण झाली आहेत.

‘खामोशी’च्या सेटवर चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याशी झालेल्या भांडणाचे किस्से सांगताना नाना म्हणाले की, ‘संजय लीला भन्साळींसोबत मी पुन्हा काम करु शकतो, पण मला वाटते की मी ज्याप्रकारे त्यांच्यावर ओरडलो, त्याचे त्यांना वाईट वाटले असेल. त्यानंतर आम्ही काम केले नाही. या भांडणाने आपल्या आयुष्यात काही फरक पडला असेही नाही.

नानांनी कबूल केले की, ‘ संजयसोबत काम करतानाची मला खूप आठवण येते, पण समस्या अशी आहे की मी खूप उद्धट आहे. मी खूप वाईट गोष्टी बोलतो. यामुळे तो अस्वस्थ झाला असावा. जरी मी त्याच्याशी काहीही क्लिअर करण्याचा प्रयत्न केला नाही. या छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांना समजावून सांगायच्या असतील तर इतके दिवस एकमेकांना जाणून घेण्यात काय अर्थ आहे? मला त्यात माझा दोषही दिसत नाही. बघू, वेळ आल्यावर सोडवू.

याआधी ‘द लल्लनटॉप’शी बोलताना नाना पाटेकर यांनी संजय लीला भन्साळी यांच्याशी झालेल्या भांडणाबद्दल सांगितले होते. ते म्हणाले, सिनेमातल्या एका सीनमध्ये माझ्या पत्नीला हृदयविकाराचा झटका येतो. त्यात आम्ही दोघेपण मुके दाखवलो होतो. सीन असा होता की मी पत्ते खेळत आहे. आणि ती माझ्या मागे आहे. तेव्हाच तिला त्रास होतो. आता संजयला मी मागे वळून पाहावे असे वाटत होते. ती माझी पत्नी असून आमच्यात मुख संवाद उत्तम असतो असे त्याचे म्हणणे होते. पण माझ्या मागे काहीतरी घडत आहे असे मला आतून जाणवले पाहिजे ना, तरच मी मागे फिरेन. मी त्याला बोललो की काय होत आहे हे माहित नसताना मी का मागे फिरू? यावरुन आमच्यात वाद झाले.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम

आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग;’या’ 5 राशींचं भाग्य उजळणार

शॉर्ट ड्रेस, मोकळे केस, बॉलिवूडची स्लीमगर्ल मलायका अरोरा एपी ढिल्लोनच्या गाण्यावर थिरकली