भारतीय क्रिकेट संघाचा(team) स्टार फलंदाज ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. तो या संघाचा कर्णधार आहे. पण आयपीएल 2024 चा हंगामा संपल्यापासून पंत दुसऱ्या संघाशी करार करू शकतो अशा बातम्या समोर येत आहेत. तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. यानंतर दिल्ली कॅपीटल त्याला कुठेही जाऊ देणार नाही आणि पहिला खेळाडू म्हणून कायम ठेवणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. पण आता पंतबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, जर ऋषभ पंत दिल्लीला सोडून लिलावात आला तर आरसीबी त्याच्यावर सर्वाधिक बोली लावू शकते. दिनेश कार्तिकच्या निवृत्तीनंतर संघ(team) अशा यष्टीरक्षकाच्या शोधात आहे. जो स्फोटक फलंदाजीही करू शकेल. पंत या शर्यतीत आघाडीवर आहे. तो कॅप्टनसी मटेरिअलही आहे. त्यामुळे आरसीबी त्याच्याबाबत खूप विचार करत आहे आणि लिलावात त्याच्यासाठी मोठी बोली लावू शकते. पंत यावेळी आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने असेही लिहिले होते की, जर तो लिलावात आला तर कोणती टीम त्याला किती रूपये मध्ये संघात घेईल. रिपोर्ट्सनुसार, या पोस्टनंतर दिल्ली कॅपिटल्सचे ऑनर त्याच्यावर नाराज झाले.
ऋषभ पंत 2016 पासून दिल्लीशी संबंधित आहे. तो 2021 पासून संघाचे नेतृत्व करत आहे. ऋषभ पंतने 111 सामन्यात 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 च्या स्ट्राईक रेटने 3284 धावा केल्या आहेत, 1 शतक आणि 18 अर्धशतकं झळकावली आहेत. दुखापतीमुळे पंत आयपीएल 2023 चा भाग नव्हता.
हेही वाचा:
प्रचारासाठी अजित दादांनी शक्कल लढवली! AI चा वापर करून लाडक्या बहिणींना साद
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा MMS लीक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
मुलांना सांभाळणाऱ्या बाईसोबत अरमान मलिकने केलं चौथ लग्न?