टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी म्हणजे 9 जूनला स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे (team india). न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी स्टेडिअमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहे. करोडो क्रिकेट प्रेमींची नजर या सामन्यावर लागली आहे. रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळण्यावर सस्पेन्स निर्माण झाला आहे.
रोहित शर्मा दुखापतग्रस्त
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी20 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध दमदार अर्धशतक केलं होतं. रोहितने 37 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकार लगावत 52 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या महतत्वाच्या सामन्यात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण या सामन्याआधी सराव करताना रोहित शर्मा दुखापतग्रस्त झालाय. रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळतेय. ही दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. पण जर रोहित शर्मा या सामन्यात खेळूच शकला नाही तर टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कोण करणार हा प्रश्न आहे.
टीम इंडियासमोर हे पर्याय
टीम इंडियासमोर सलामीसाठी अने पर्याय आहेत. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहितबरोबर विराट कोहलीने भारतीय डावाची सुरुवात केली होती. पण कोहलीला खास कामगिरी करता आलेली नाही. तो फक्त एक धाव करुन बाद झाला. पण आता रोहित न खेळल्यास विराट कोहलीच सलामीला येईल त्याच्याबरोबर यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियासाठी यशस्वी जयस्वलालने अनेकवेळा चांगली सलामी केली आहे. टीम इंडियासमोर दुसार पर्याय आहे संजू सॅमसनचा. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात संजू सॅसमनला सलामीला पाठवण्यात आलं होतं, पण तो केवळ एक धाव करु शकला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नाही तर यशस्वी जयस्वाचं पारडं जास्त जड आहे.
ऋषभ पंत फॉर्मात
आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला संधी देण्यात आली होती. पंतने 36 धावांची महत्त्वपूर्ण खेळ केली. याआधी सराव सामन्यातही पंतने अर्धशतकी खेळी केली होती. त्याने 32 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला तिसऱ्याच क्रमांकावर फलंदाजीला उतरवलं जाईल.
याशिवाय पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा :
‘आरक्षण दिलं नाही तर, एकही आमदार निवडून येणार नाही’; फडणवीसांच्या विधानानंतर जरांगेंचा इशारा
इचलकरंजीत मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा…
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ