राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे राहू नये, प्रवचन न झोडता या देशाच्या(power) जनतेला दिशा द्यावी. RSSने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर तसेच मोदींवर टीकास्त्र सोडलं. भाजपचं सध्याचं जे मोदींचं सरकार आहे ते अहंकारी सरकार आहे. त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था ( आरएसएस) करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत, असं मी मानतो, असंही राऊत म्हणाले.
लोकसेवकाला(power) अहंकार नसावा, असं काल सरसंघचालक मोहन भागवतही म्हणाले. पण गेल्या 10 वर्षांत या देशात फक्त अहंकार, इर्षा, बदल्याचं राजकारण हेच पहायला मिळालं. सत्तेचा गैरवापर झाला. आणि या सगळ्या गोष्टी भाजपची मातृसंस्था असलेली आरएसएस पहात होती. 10 वर्षांत आपल्या सगळ्यांनाच आरएसएसकडून खूप अपेक्षा होत्या, की संघाचे प्रमुख लोक हे निर्भयपणे समोर येतील आणि या बदल्याचे राजकारण, अहंकाराच्या राजकारणाला रोखण्याचा प्रयत्न करतील, असे देशातील जनतेची, विरोधकांची अपेक्षा होती. पण तसं काहीच झालं नाही.
जेव्हा १९७५ साली आणीबाणी घोषित झाली तेव्हा तत्कालीन सरसंघचलाकांनी त्या आणीबाणीचा विरोध केला होता. या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी संघाच्या काही लोकांनी अमूल्य योगदान दिले, त्यासाठी ते तुरूंगातही गेले. पण गेल्या १० वर्षांत अतिशय विरुद्ध परिस्थिती पहायला मिळाली. मात्र अहंकाराचे हे राजकारण जनतेने रोखलं आहे. येत्या काळात आरएसएसची भूमिका राहील आणि सत्तेवर जे अहंकारी नेते बसले आहेत, त्यांना तुम्ही लौकरच सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न कराल, असा आम्हाला विश्वास आहे, अशा शब्दात राऊत यांनी सुनावले.
अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये अजित पवारांविरोधात हालचाल सुरू झाली. अण्णा हलले, अण्णा बोलले या बद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या १० वर्षांत राज्यात आणि देशात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. घोटाळ्यांचा पाऊस सुरू झाला आहे. अण्णांनी त्या इतर घोटाळ्यांविरोधातही आवाज उठवला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.
हेही वाचा :
राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट…
विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर “मविआ” ला तारणार?
आज शेअर बाजारात संमिश्र संकेत; कोणते शेअर्स असतील चर्चेत?