लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या(championship) फायनल सामन्याचे आयोजन केलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने याची घोषणा केली. पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना खेळवला जाईल. आयसीसीने निवेदन जारी करत याची घोषणा केली.
लंडनच्या प्रतिष्ठित ठिकाणी म्हणजेच लॉर्ड्स मैदानात 11 ते 15 जून या कालावधीत एकमेव कसोटी खेळली जाईल, आवश्यक असल्यास 16 जून राखीव दिवस म्हणून उपलब्ध असेल, असं आयसीसीने जाहीर केलंय. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जोरदार तयारी करावी लागणार आहे. भारत सध्या WTC रँकिगमध्ये अव्वल स्थानी असल्याने भारताचं काम सोपं असणार आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तगडी टक्कर देऊ शकतो.
सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप(championship) क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल असलेले दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतात. भारताने जास्तीत जास्त दोनदा फायनलसाठी पात्रता मिळवली आहे, पण टीम इंडियाला एकदाही फायनल जिंकता आली नाही. अशातच आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कमाल दाखवून ट्रॉफी जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत फायनल जिंकली आहे. आता तिसऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाला जोर लावावा लागणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी ही अखेरची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप असू शकते. त्यामुळे विराट कोहलीच्या कामगिरीवर नक्कीच सर्वांचं लक्ष असणार आहे.
हेही वाचा:
मोठी बातमी! बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी; विधानसभेत विधेयक मंजूर
टाटा कंपनीची भन्नाट कार बाजारात लाँच; किंमत असणार फक्त…
धावत्या ट्रेनसोबत सेल्फीचा नाद तरुणीला पडला महागात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप