इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ, काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा, सुरेश हाळवणकर यांनी(Political) भाजपसाठी जिंकत पहिल्यांदा “कमळ” फुलवले. त्यांच्या नेतृत्वामुळे कोल्हापूर जिल्ह्याला भाजपचा पहिला आमदार मिळाला. सलग दोन टर्म आमदार राहिल्यानंतर, मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी पक्षाशी निष्ठा ठेवत मोठी भूमिका बजावली. प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी केली, तर हिंदुत्ववादी वातावरणाची जाणीव ठेवत विविध आमिषांना नकार देत त्यांनी पक्षाशी बांधिलकी राखली.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश हाळवणकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू होती. मात्र, पक्षाने अचानक राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर, सुरेश हाळवणकर यांनी पक्षाचा आदेश मान्य करत, राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडे यांना(Political) भाजपमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर मतदारसंघात प्रचंड मेहनत घेऊन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यात मोलाचे योगदान दिले.
राहुल आवाडे यांच्या विजयानंतर इचलकरंजीत भाजपने तिसऱ्यांदा “कमळ” फुलवले. मात्र, या यशामागे सुरेश हाळवणकर यांचे नेतृत्व आणि योगदान अनन्यसाधारण आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून दूर गेल्यानंतर जिल्ह्यात प्रभावी नेत्यांची कमतरता भासत आहे. गेल्या काही वर्षांत भाजपच्या कोणत्याही नेत्याला मंत्रीपद मिळालेले नसल्याने हाळवणकरांना संधी दिल्यास, कोल्हापूरसह जिल्ह्यातील भाजपचे वर्चस्व अधिक भक्कम होईल, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.
राज्यभरात भाजपच्या यशात योगदान देणाऱ्या हाळवणकरांना विधान परिषदेवर स्थान मिळेल काय, आणि त्यांना मंत्रीपदाचा सन्मान दिला जाईल काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील भाजपचे भवितव्य त्यांच्या पुढील भूमिकेवर अवलंबून असेल, यात शंका नाही.
हेही वाचा :
‘एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही केवळ… उदय सामंत यांचं विधान
लग्नासाठी नवरा शोधणाऱ्या महिलेची गेटवे ऑफ इंडिया येथे पोस्टरबाजी… Viral Video
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; शरद पवारांवर टीका