शहरात सकाळी फिरण्यासाठी किंवा शतपावलीसाठी घराबाहेर पडणाऱ्या (walk)ज्येष्ठ नागरिकांना दुचाकीस्वार चोरटे वारंवार लक्ष्य करत आहेत. मागील दीड महिन्यात शहरात अशा २१ जबरी चोरीच्या घटना घडल्या असून, पोलिस प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

सकाळच्या वेळी रस्त्यांवर गर्दी तुलनेने कमी असते, त्यामुळे चोरट्यांना नागरिकांकडून मोठा प्रतिकार होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळेच चोरटे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना अधिक धोका आहे. गेल्या ४५ दिवसांत (walk)शहरात अशा २१ घटना घडल्या असून त्यापैकी १८ घटना उघडकीस आल्या आहेत.
शक्यतो एकटे फिरणे टाळावे आणि सोबत कोणाला तरी घेऊन जावे.
अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे.
किरकोळ कारणावरून वाद घालू नयेत.
दागिने घालून फिरू नयेत.
पैसे व मोबाईल अशा प्रकारे ठेवावेत की चोरट्यांना ते सहज हिसकावता येणार नाहीत.
शंकास्पद व्यक्ती किंवा वाहन दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.
दुचाकीस्वाराने पत्ता विचारल्यास त्याच्याजवळ थांबू नये.
सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, “शहरात सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे प्रामुख्याने (walk)महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.”शहरातील नागरिकांनी सावध राहावे आणि चोरीसंबंधी कोणतीही माहिती पोलिसांना त्वरित द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
शिंदे-फडणवीस नाराजीचा नवा अंक सुरू?
‘या’ लाडक्या बहिणी अपात्र! आठवा हफ्ता मिळणार नाही
परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी मिळण्याची संधी 240000 रुपये भरघोस पगार