पैसा खेचण्याचं मशीनच म्हणा ना..! या 5 गोष्टी घरात ठेवाल, तर संपत्ती, बँक बॅलन्स वाढेल

अनेकदा असं होतं की, वारंवार मेहनत करूनही बऱ्याच वेळेस पैशांची(money) कमतरता जाणवते. सतत खर्चांवर खर्च, बँक बॅलन्स वाढलेला दिसत नाही, धनहानी होत असेल तर आता काही सोप्या, पण प्रभावी वास्तु उपायांचा अवलंब करण्याची वेळ आली आहे.

वास्तुशास्त्रामध्ये अशा 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरामध्ये योग्य दिशेने ठेवल्या तर या गोष्टी पैसे ओढणाऱ्या मशीनपेक्षा कमी नाही. या गोष्टी केवळ संपत्तीच आकर्षित करत नाहीत, तर घरात स्थिरता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. वास्तुशास्त्रानुसार, जाणून घेऊया त्या 5 चमत्कारिक गोष्टी, ज्या तुमच्या आयुष्यात पैसा(money) आणि संपत्तीचा मार्ग उघडू शकतात.

वास्तुशास्त्र हे केवळ दिशा आणि सजावटीचे शास्त्र नाही तर आपल्या जीवनात संपत्ती, आनंद आणि स्थिरता आणण्याचा हा एक शक्तिशाली मार्ग आहे. वास्तूनुसार घरामध्ये काही गोष्टी योग्य दिशेने ठेवल्यास या गोष्टींमुळे धन प्रवाहाचा वेग वाढू शकतो.

या 5 गोष्टी घरात ठेवल्याने केवळ आर्थिक संकटातूनच सुटका होत नाही तर कायमस्वरूपी समृद्धी आणि मोठा बँक बॅलन्सही मिळू शकतो. या कारणास्तव, लहान वास्तू बदलांनी मोठे आर्थिक बदल घडवून आणले जाऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार, जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने घराची आर्थिक स्थिती उत्तम बनवता येते.

श्रीयंत्र घरात ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे, जे घरामध्ये धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. श्रीयंत्र पूजास्थानाजवळ किंवा घरात सुरक्षित ठेवा. शुक्रवारी श्रीयंत्रासमोर दिवा लावून ‘श्री सूक्त’ पाठ करा.

मनी प्लांट
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा. मनी प्लांट लावल्याने घरामध्ये संपत्ती(money) आणि सौभाग्य वाढते. कोरडा किंवा सुकलेला मनी प्लांट घरात ठेवू नका.

श्रीमद्भागवत गीता घरी ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, श्रीमद्भगवद्गीता घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. वास्तूनुसार गीता वाचल्याने आत्मविश्वास वाढतो. याच्या मदतीने प्रत्येक समस्या दूर होते. घरात सकारात्मकता येते आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात.

चांदीचे नाणे
वास्तुशास्त्रानुसार, चांदीचे नाणे तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. चांदीच्या नाण्याला गंध लावा आणि तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. चांदी चंद्राशी संबंधित आहे, ते मन शांत आणि आनंदी ठेवते. यामुळे संपत्तीमध्ये समृद्धी येते.

हळकुंड
शास्त्रामध्ये हळदीला भगवान विष्णूशी संबंधित मानले जाते. भगवान विष्णू जिथे असतात तिथे लक्ष्मीचा वास नक्कीच असतो. अशा वेळी तिजोरीत हळकुंड ठेवा, यामुळे लक्ष्मीची कृपा राहील आणि पैशाची कमतरता भासणार नाही.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)

हेही वाचा :

यंदा कर्तव्य आहे? IPL 2025 नंतर शुभमन गिल लग्न करणार?

दररोज एक संत्री खाल्ल्याने Depression चा धोका 20% होणार कमी

शिक्षकानेच ओलांडली मर्यादा! विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांना पाजली दारु; संतापजनक VIDEO व्हायरल