कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजस्थानच्या जैसलमेर परिसरातील एका वाळवंटी प्रदेशातील गावात कुपनलिका खोदताना पाण्याचा प्रवाह उसळ्या मारत बाहेर पडू लागला. वाळवंटात पाणीच पाणी झाले. देशभरातील भूगर्भ शास्त्रज्ञ या घटनेने चकित झाले. एखादी गुप्त नदीचा प्रकट भावी असे वाटावे अशी स्थिती काय निर्माण झाली याचा शोध किंवा त्या मागची कारणे आता शोधली जातील पण भूपृष्ठीय वातावरणाशी(environment) किंवा पर्यावरणाशी किंवा पश्चिम घाटाशी मानव जाती कडून जी छेडछाड केली जाते आहे त्याचा हा दृश्य परिणाम असावा असा स्थूल मानाने निष्कर्ष काढण्यात आला आहे.
जागतिक तापमानात होत असलेली वाढ, घटत चाललेली भू जल पातळी, बदललेले किंवा बेभरवशाचे ऋतूचक्र, वेळी वेळी पडणारा पाऊस आणि पश्चिम घाटावर होत असलेले अतिक्रमण, आकुंचित होत चाललेले जंगल क्षेत्र याचे एकत्रित प्रतिकूल परिणाम सध्या महाराष्ट्रात आणि देशात दिसू लागले आहेत. अवकाळी पाऊस आणि उभ्या खरीप आणि रब्बी पिकांचे अतोनात नुकसान हा आता नेहमीचा प्रकार झाला आहे.
जागतिक पर्यावरणात(environment) महत्त्वाचा घटक असलेल्या पश्चिम घाटाचा बराचसा भाग भारतीय हद्दीतून जातो. म्हणूनच पर्यावरणाचे संतुलन राखण्यात भारतीयांची जबाबदारी मोठी आहे पण ती आपण प्रभावीपणाने घेतो आहे काय हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारला पाहिजे.
माणसाला चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी जंगल समृद्धी आवश्यक आहे. जगण्यासाठी लागणारी ऊर्जा, ऑक्सीजन व तत्सम संसाधने ही जंगलातूनच मिळत असतात. म्हणूनच उत्तम पर्यावरण हवे असेल तर एकूण भूक्षेत्रफळाच्या 33% जमीन ही जंगलाने अच्छादित झालेली असली पाहिजे. दुर्दैवाने जंगल क्षेत्र 23 टक्क्यांपेक्षाही कमी आहे आणि महाराष्ट्रात तर ही टक्केवारी सोळा-सतरा टक्क्यावर आलेली आहे. एकेकाळी महाराष्ट्रात जंगल क्षेत्र 33% च्या आसपास होते.
महाराष्ट्राच्या 3 लाख 7 हजार 713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी 47 हजार 476 क्षेत्र वन अच्छादित आहे म्हणजे 15.43% इतकी पातळी खाली आलेली आहे आणि ती चिंता करावी अशी आहे. भविष्यात जंगल क्षेत्र कमी होत गेले तर काही ठिकाणी कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण इतके वाढेल की माणसाला तिथे वास्तव्य सुद्धा करता येणार नाही अशी भीती पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे.
इमारतीसाठी लागणारे लाकूड, जळणासाठी लागणारे लाकूड, बांबू, विड्याची पाने, तेल, डिंक, राळ, कंदमुळे, फळे, तंतू, औषधी वनस्पती, हे सर्व जंगलाच्या(environment) माध्यमातून माणसाला मिळत असते. अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना कच्चा माल हा जंगलातूनच उपलब्ध होत असतो. सर्व प्रकारची आयुर्वेदिक तसेच ऍलोपॅथी औषधांची निर्मिती करण्यासाठी सर्व घटक वनस्पती जंगलातून मिळत असतात. मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन जंगलातील झाडांच्या मुळेच मिळत असतो. एकूणच मानव जातीच्या अस्तित्वासाठी जंगल क्षेत्र हे आपले मोठे योगदान देत असते.
अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तरांचल, अंदमान निकोबार, दादरा हवेली नगर, लक्षद्वीप आदी ठिकाणी 33% पेक्षाही अधिक जंगल क्षेत्र आहे. उर्वरित राज्यांमध्ये जंगल क्षेत्र आकुंचित होत आहे. त्याची कारणे शोधून, त्यावर कठोर उपाय योजना करून जंगल क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे.
वाढत चाललेले शहरीकरण, पिकावू जमिनीवर होत असलेली निवासी किंवा औद्योगिक बांधकामे, जिल्हा तसेच राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचे होत असलेले रुंदीकरण, चार पदरी महामार्ग, सहा तसेच आठ मार्गी महामार्ग होत असल्याने त्यासाठी केली जात असलेली किंवा करण्यात आलेली करोडो झाडांची कत्तल, मोठमोठे प्रकल्प, अशा अनेक मार्गाने जंगल क्षेत्र झपाट्याने कमी होऊ लागले आहे.
जंगलावर अतिक्रमणे होत चालल्यामुळे जंगली प्राण्यांच्या अधिवासात कमालीची घट होऊ लागली आहे. त्यामुळे हे प्राणी नागरी वस्तीत सर्रास दिसू लागले आहेत. कोल्हापूरचा उदाहरण घेता येईल. राधानगरी, दाजीपूर या पश्चिम घाटातील दोन अभयारण्यामध्ये विविध प्रकारच्या तसेच औषधी दुर्मिळ वनस्पती आहेत. कृषी विद्यापीठांचे विद्यार्थी वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी या अभयारण्यामध्ये येत असतात. इथे दुर्मिळ वनस्पती आहेत.
विविध प्रकारचे वन्य पशु, सरपटणारे प्राणी, या अभयारण्यात आहेत. पण याच परिसरात बॉक्साईट मिळवण्यासाठी प्रचंड प्रमाणावर खोदकाम सुरू आहे, या अति संवेदनशील जंगल क्षेत्रात अवजड वाहनांचा आवाज आहे, याचा प्रतिकूल परिणाम जंगल(environment) नक्षत्रावर आणि तेथील वन्य जीवावर होताना दिसतो आहे. आता अलीकडच्या काळात या खोदकामावर प्रतिबंध घालण्यात आला असला तरी झालेले नुकसान भरून काढता येईल असे नाही.
ग्रामीण भागातील लोकांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रत्येक गावाच्या आसपास देवराई असायच्या. त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील ऋतुचक्र अबाधित होते. आता ह्या देवराई येनकेन प्रकारेन काढून टाकले आहेत किंवा त्याची बेकायदा तोड झालेली आहे. या देवराई म्हणजे गावां नजीकची छोटी जंगलेच समजली जात असत. आता त्याच्यावरच कुऱ्हाड चालवली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिसून न येणारे नुकसान झालेले आहे. म्हणूनच माणसाने आता वेळीच सावध झाले पाहिजे. निसर्ग वाचवला पाहिजे. त्यातच मानव जातीचे कल्याण आहे.
हेही वाचा :
Elon Musk च्या Starlink ला एयर इंडियाचा झटका! Tata ची मोठी झेप
महाराष्ट्रातील राजकारण तापणार?, आज सर्वपक्षीय मूक मोर्चा
आज शनिदेव ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न, नववर्षातील पहिली शुभवार्ता मिळणार