महाकुंभ मेळ्यात आयआयटी बाबा प्रचंड प्रकाशझोतात आला होता. (complaint)त्यानंतर आयआयटी बाबानं भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्याबद्दल भाकित केलं होतं. त्यानं केलेलं भाकित खोटं ठरलं आणि बाबा प्रचंड ट्रोल झाला होता. आता आयआयटी बाबा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला भर कार्यक्रमात मारहाण करण्यात आली आहे.बाबाने एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. मात्र, मुलाखतीदरम्यान, बाबासोबत गैरवर्तन करण्यात आलं. त्याला जबरदस्तीनं कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि काठीनं हल्लाही केला. बाबानं ही माहिती इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे दिली आहे. बाबावर हल्ला नेमका कुणी केला आणि केला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आयआयटी बाबांनी सांगितले की, ‘२८ फेब्रुवारीला एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. चर्चेदरम्यान अचानक वातावरण बदलले. भगवे कपडे घातलेले काही लोक स्टुडिओमध्ये (complaint) आले. नंतर हल्ला करण्यात आला. हल्ला करत जबरदस्तीनं एक खोलीत कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला.
नंतर एका स्वामी वेदमुर्ती नंद सरस्वती यांनी कॅमरा बंद करून काठीनं वार केले’. ही सगळी माहिती आयआयटी बाबानं आपल्या इन्स्टाग्राम लाईव्हवर येत याची माहिती शेअर केली. (complaint)घटनेनंतर आयआयटी बाबा थेट नोएडा सेक्टर १२६ येथील पोलीस ठाण्यात गेले. मात्र, त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. असा आरोप बाबाने केला आहे. या घटनेनंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हेही वाचा :
चॅम्पियन ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात बॉम्बस्फोट
मेट्रो स्टेशनवर खुल्लमखुल्ला रोमान्स जोडप्याचा किस करतानाचा VIDEO व्हायरल
पत्नीने छळ केल्यामुळे TCS मॅनेजरने संपवलं जीवन video viral