महाराष्ट्रातील एसटी(ST) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आर्थिक संकटाच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणात काहीसा दिलासा देण्यासाठी सरकारने 350 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावर निर्माण झाले आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/10/image-478.png)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सप्टेंबर 2024 च्या सवलतीच्या मूल्याच्या रकमेसाठी सरकारकडे विनंती केली होती. यावेळी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या पत्राच्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने या विनंतील मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने एसटी(ST) महामंडळासाठी 350 कोटी रुपयांची निधी मंजुर देऊन दिवाळीपूर्वी ही रक्कम वीतरित करण्याचे नियोजन केले आहे.या निधीमुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर सुविधांसाठी मदत मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या परिवहन आयुक्त या निघी वितरणासाठी प्राधिकृत करण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी एसटी महामंडळांना तातडीने रक्कम वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी वेतनाची हमी मिळणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी सणाच्या काळात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
दरम्यान राज्य सरकारचा हा निर्णय महामंडळाच्या आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एसटी महामंडळाचे होणारे व्यावसायिक नुकसान आणि आर्थिक ताण लक्षात घेता ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. सरकारने महामंडळाच्या संकटातून सावरण्यासाठी केलेली मदत एसटीच्या सामान्य कर्मचारी वर्गाला दिलासा देणारी ठरणार आहे.
हेही वाचा :
.जेव्हा आमिर खानला दिवसभर KISS करत होती ‘ही’ अभिनेत्री…
एकनाथ शिंदेकडून शिवसेना नावाला कलंक; ‘या’ नेत्याचा मोठा आरोप
बेपत्ता अंगणवाडी सेविकेबद्दल मोठी अपडेट, नदीमध्ये जे सापडलं ते धक्कादायक!