साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या (occasion)अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे…. राज्य सरकार येत्या अक्षयतृतियेला लाडक्या बहीणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय…राज्य सरकारने आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 9 हप्ते जमा केले आहेत.. त्यामुळे एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? याकडे लाडक्या बहीणी डोळे लावून बसल्या आहेत… त्यातच 10 वा हप्ता रामनवमीला लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.. मात्र रामनवमीचा मुहूर्त टळल्याने अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला लाडकीच्या खात्यात खटाखट 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे… मात्र हे पैसे जमा झालेत का? ते कसं शोधायचं? पाहूयात.

लाडकीचे पैसे चेक करायचे कसे?
पैसे खात्यावर जमा झाल्यास तुम्हाला मेसेज येईल
तुम्ही ऑनलाईन बँकींग अॅपवर(occasion) चेक करु शकता
ऑफलाईन पद्धतीने बँकेत जाऊन पैसे आले की नाही? चेक करु शकता
बँकेत पासबुकवर एन्ट्री केल्यास पैसे जमा झाल्याची माहिती मिळेल
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारने लाडकींना अपात्र करण्याचा सपाटाच लावला.. त्यातच आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लाडकींची नावं वगळल्याचं (occasion)समोर आलंय.. तर राज्य सरकारने अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या निधीलाही कात्री लावण्यात आलीय.. त्यामुळे अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर किती लाडक्या बहिणींना सुखद धक्का मिळणार की अजून काही लाडक्या बहिणींना अपात्रतेचा झटका बसणार? याकडे लक्ष लागलंय.
हेही वाचा :
सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंच आक्रमक,आयुक्तांना आग्रही राहण्याचे निवेदन.
आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, उत्पन्नाचे मार्ग मोकळे होणार
झापुक झुपूक सुरज आणि किंग कोहली आले समोरासमोर, Video Viral