उद्योजकांना अनुदान मिळवून देण्यासाठी उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; आ. राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने उद्योजकांना दिलासा

इचलकरंजी ०३ : सामुहिक प्रोत्साहन योजना २०१३ व २०१९ मधील बांधकाम परवाना असुनदेखील उद्योजकांना अनुदान मिळालेले नाही अशा उद्योजकांची बैठक उद्योगमंत्री मा.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या दालनात आयोजीत करणेत आली होती. सदर मिटींगला(meeting) इचलकरंजीचे आमदार मा.राहुल आवाडे उपस्थित होते.

प्रथम आमदार राहुल आवाडे यांनी सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्र असलेल्या उद्योजकांना अनुदान मिळत नसलेचा प्रश्न प्रभाविपणे मांडला.

यानंतर उद्योगमंत्री मा.उदय सामंत यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना या उद्योजकांना न्याय देणे गरजेचे आहे. त्यांनी उद्योग चालू ठेवलेला आहे. त्यासाठी कांही सुधारणा करायला लागली तर ती करा पण या सर्व उद्योजकांना अनुदान मिळले पाहिजे अशा सुचना केल्या व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवून त्यांचे बांधकामे नियमीत करणेबाबत मी स्वत: बोलेन असे सांगून आमदार राहुल आवाडे यांनीसुद्धा पाठपुरावा करावा असे सांगितले.

त्याचबरोबर ज्या उद्योजकांनी उद्योग विस्तार केलेला आहे. त्यांना मशिनरीचे अनुदान देणेत यावे. याबाबतीत पुढील आठ दिवसांत अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा अशा सुचना केल्या. तसेच ज्या उद्योजकांना पात्रता प्रमाणपत्र मिळालेले आहे त्यांना त्वरीत अनुदान देणेत यावेत अशा सुचना केल्या.

सदर मिटींगला(meeting) सहसंचालक संजय कोरबू साहेब, पूणे जिल्हा उद्योग केंद्राचे रजपूत साहेब, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्र कुशवाह, उद्योग विभागाचे अवर सचिव विनोद मेंडे, एम.आय.डी.सीचे मुख्य कार्यकारी अधिकार पी.व्हेनरासू, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी, कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील, दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापूरे, प्रकाश मोरे, उद्योजक गजानन होगाडे, दयानंद छप्रे, श्रीकांत टेके, खलील मैंदर्गी, शशिकांत सोकाशे, नामदेव कांबळे, गौरव गोंदकर, रोहित मेटे, अवधूत चौगुले इ. उपस्थित होते.

हेही वाचा :

इचलकरंजीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, भाजप पदाधिकाऱ्यांकडून तक्रार

उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा धमाका!

आजची 4 एप्रिल तारीख नशीब पालटणारी! ‘या’ 5 राशींना झटक्यात श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही..