शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अग्रीम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

खरीप हंगाम २०२४ ची पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या(farmers) बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पूर्णा तालुका परिसरातील शेतशिवारात खरीप हंगाम २०२४ च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यासाठी सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली होती.

मागील तीन ते चार महिन्यांपासून पीकविमा अग्रीम मिळण्याची शेतकरी वाट बघत होते. अखेर आजपासून प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या(farmers) खात्यात पीक विमा अग्रीमची रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना ३३५.९० कोटी रुपयांची अग्रीम मंजूर झालेली आहे.

अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी जिल्ह्यात ७ लाख ६३ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी या पिकांसाठी ५ लाख २४ हजार २६७ हेक्टरचा विमा उतरवला होता, सोयाबीन, कापूस व तूर या पिकांसाठी विमा मंजूर झाला होता.

यात ७ लाख १४ हजार १६१ शेतकऱ्यांनी या पिकांसाठी नोंद केली आहे. यामध्ये सोयाबीन ३ लाख ८५ हजार हेक्टर, कापूस, ८९ हजार हेक्टर तर तूर ३५ हजार ५४७ हेक्टर असा पीकविमा भरलेले क्षेत्र आहे.

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर अग्रीम जाहीर करण्यासाठी रेटा लावण्यात आला होता. यामुळे तो मंजूरही झाला. मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून तो अदा केला जात नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते.

अनेक पक्ष, संघटनांनी यासाठी निवेदनेही दिली होती. आंदोलनेही करण्यात आली होती. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाकडून हे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा संपली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

पीकविम्याबाबत कायम औदासीन्य बाळगणाऱ्या कृषी विभागाला अजूनही याबाबत काहीच माहिती नसल्याचे दिसते. प्रभारी कृषी अधीक्षक अधिकारी दौलत चव्हाण यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मात्र विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी कंपनीचे प्रिमियम मिळाल्याने आजपासून शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याचे सांगितले.

ज्या शेतकऱ्यांना(farmers) अग्रीम मंजूर झाली, त्यांच्या खात्यावर 10 एप्रिलपासून रक्कम जमा होणार आहे. सोयाबीन उत्पादकांना २६८.५९ कोटी रुपये, कापूस ५३ कोटी तर तुरीसाठी १४.१४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

हेही वाचा :

‘एक दिवस उपाशी राहीन, पण सेक्स…’; समंथाचं उत्तर ऐकून सगळे शॉक

अखेर प्रशांत कोरटकर तुरूंगाबाहेर; कोल्हापूर पोलिस सीमेपर्यंत देणार सुरक्षा

महाराष्ट्रासाठी खुशखबर! लवकरच धावणार नवी सर्किट ट्रेन, फडणवीसांची मोठी घोषणा!