शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पीक विमा योजना बंद होणार?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात (farmers)आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.पीक विमा योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने शेतकरी चिंतेत होते. यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी पीक विम्यातील घोटाळ्यावरही भाष्य केले.

योजना बंद होणार नाही, पण… :

पीक विम्यात गैरप्रकार होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची चर्चा होती. मात्र, कृषीमंत्र्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. माणिकराव कोकाटे (farmers) यांनी स्पष्ट केले की, सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही, पण योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी उपाययोजना आणि काही निर्णय घ्यावे लागतील.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय :

आवश्यक निर्णयांबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, पीक विमा योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

योजनेची पुनर्रचना? :

माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा योजनेची पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, योजनेत सुधारणा करणे गरजेचे आहे, कारण काही लोक याचा गैरफायदा घेतात आणि कंपन्यांकडूनही लूटमार होते. त्यामुळे निकष बदलले जातील. अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयात विमा(farmers) आणि इतरांना शंभर रुपयात विमा, असा निर्णय घेता येणार नाही. पिकाप्रमाणे विम्याचा दर आकारता येईल, पण सर्वांसाठी समान नियम असावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

बड्या चित्रपटासाठी मोनालिसाला आली ऑफर, मिळणार ‘एवढ्या’ लाखाचं मानधन

अमूल दूधाच्या किंमतीत घट?, जाणून घ्या नवे दर

पवारांशी आघाडी करताना विचार करायला हवा होता, आता पक्ष…; माजी आमदाराचा ठाकरेंना घरचा आहेर