सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु आहे. दिवाळीची खरेदीसाठी बाजारात लगबग सुरु आहे. आज दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी आहे. सहसा भारतात धनत्रयोदशीला सोनं(gold prices) खरेदी केलं जातं. धनत्रयोदशीच्या नवीन भांडी तसेच सोने आणि चांदी यांचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. तुम्ही देखील आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या आधी तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे जर जाणून घ्या. काही भागांत सोन्याचा दर कमी झाला असून चांदीचा दर स्थिर आहे. तर काही भागांत सोन्याचा दर आजही स्थिर आहे.
काही शहरांत आज सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 73,290 रुपये आहे. काल सोन्याचा दर 73,100 भाव होता. म्हणजे आज दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 79,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,950 रुपये होता. म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा भाव आज काही प्रमाणात कमी झाला आहे. आज दरात बदल झाला आहे.
मात्र, येत्या काही दिवसांत सोन्याचे(gold prices) भाव वाढतील, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. चांदी 1,07,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. काल देखील चांदीचे दर स्थिर होते. आज ठाण्यात सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 83,316 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी 76,757 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 62,801 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. ठाणे शहरातील सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.
आज मुंबई शहरात 24 कॅरेटसाठी सोन्याचा दर 84,833 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 78,154 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 63,945 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज पुणे शहरात 24 कॅरेटसाठी सोन्याचा दर 83,316 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 76,757 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 62,801 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आज चंद्रपूरमध्ये 24 कॅरेटसाठी सोन्याचा दर 83,316 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 76,757 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 62,801 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच आज गडचिरोलीमध्ये 24 कॅरेटसाठी सोन्याचा दर 83,316 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 76,757 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 62,801 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज यूपीची राजधानी लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 73,110 रुपये आहे. राजधानीत प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 79,940 रुपये आहे.
हेही वाचा :
मनोज जरांगे पाटलांकडून पत्ते ओपन ; या तीन जातींवर खेळणार मोठा डाव
फटाक्यांनी भरलेल्या दुकानात स्फोट; घटनेचा थरराक व्हिडिओ व्हायरल
आत्महत्येची भाषा करणारे आमदार कालपासून बेपत्ता, मुख्यमंत्र्यांचा तातडीने फोन