पासपोर्ट अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील पाच दिवस सेवा बंद;

पासपोर्ट (Passport)अर्जदारांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं आहे की, पुढील पाच दिवस पासपोर्ट सेवा बंद राहणार आहे. या काळात अर्जदारांना कोणत्याही प्रकारच्या सेवांचा लाभ घेता येणार नाही.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, तांत्रिक कारणांमुळे ही सेवा बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे ज्यांनी या कालावधीत पासपोर्टसाठी अर्ज केला आहे किंवा अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना पुढील काही दिवसांसाठी त्यांच्या अर्जांची प्रक्रिया पुढे ढकलावी लागेल.

काय आहे पुढील कार्यवाही?

मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर अर्जदारांना नवीन अपॉइंटमेंट तारखा दिल्या जातील. तसेच, अर्जांची प्रक्रिया वेगाने करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत.

अर्जदारांनी पुढील माहिती आणि अपॉइंटमेंटसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे. त्यामुळे, अर्जदारांनी काळजी न करता पुढील तारखांबाबत ताज्या अपडेट्सची वाट पाहावी.

हेही वाचा:

“उद्धव ठाकरेंची खरंच दया येते…” देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

दहिसर येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

एटीएम फसवणुकीचा नवा प्रकार: मदतीच्या नावाखाली वृद्धांना लुटले