गुगल मॅप युजर्ससाठी महत्त्वाची टीप! लोकेशन हिस्ट्री, सर्च रिजल्ट अशा पद्धतीने करा डिलीट

तुम्ही गुगल मॅप युजर असाल किंवा तुम्ही प्रवासावेळी गुगल मॅपचा(google map) वापर करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की गुगल मॅपच्या वापरामुळे अज्ञात मार्ग देखील अगदी सोपे होतात. आपण गुगल मॅपवर अनेक ठिकाणं सर्च करतो. पण तुम्हाला माहीत आहे की, गुगलला तुमच्या प्रत्येक ठिकाणाची माहिती असते. म्हणजेच तुम्ही कोणत्या तारखेला कोणत्या ठिकाणी होता, कोणतं ठिकाण सर्च केलं होतं, ही तुमची सर्व माहिती गुगल मॅपवर सेव्ह केली जाते. अशा परिस्थितीत ही माहिती गुगल मॅपवरून काढून टाकणे आवश्यक आहे.

गुगल मॅपवर(google map) सेव्ह करण्यात आलेली कशा प्रकारे डिलीट करायची याबद्दल अनेकांना कल्पना नसते. तर आता आम्ही तुम्हाला गुगल मॅपवर लोकेशन हिस्ट्री, सर्च रिजल्ट कशा पद्धतीने डिलीट करायचं याबद्दल सांगणार आहोत. कारण गुगल तुमची माहिती सेव्ह करत असला तरी देखील तुम्हाला प्रायव्हसी सेटिंगची सुविधा दिली जाते. ज्यामुळे तुम्ही सर्च हिस्ट्री तसेच लोकेशन हिस्ट्री गुगल मॅपवरून अगदी सहज डिलीट करू शकता.

गुगल मॅपवर सर्च हिस्ट्री कशी डिलीट करायची:
-सर्वप्रथम तुम्हाला अँड्रॉईड फोनवर गुगल मॅप्स ॲप ओपन करावे लागेल.
-आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला प्रोफाइल पिक्चरवर टॅप करावे लागेल.
-आता तुम्हाला सेटिंग्जवर टॅप करावे लागेल.
-आता तुम्हाला Maps History वर टॅप करावे लागेल.
-आता तुम्हाला निळ्या रंगाच्या डिलीट बटणावर टॅप करावे लागेल.
-सर्च हिस्ट्री डिलीट करणायासाठी, तुम्ही चार पर्यायांमधून टाइम पीरियड निवडू शकता.

गुगल मॅपवर लोकेशन हिस्ट्री कशी डिलीट करायची:
-सर्वप्रथम तुम्हाला अँड्रॉईड फोनवर गुगल मॅप्स ॲप ओपन करावे लागेल.
-आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला प्रोफाइल पिक्चरवर टॅप करावे लागेल.
-आता तुम्हाला सेटिंग्जवर टॅप करावे लागेल.
-येथे तुम्हाला तुमच्या टाइमलाइनवर क्लिक करावे लागेल.
-आता तुम्हाला वरच्या उजवीकडे दिसणाऱ्या थ्री डॉट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
-आता तुम्हाला सेटिंग्ज आणि प्रायव्हसीवर टॅप करावे लागेल
-खाली स्क्रोल करा आणि सर्व लोकेशन हिस्ट्री डिलीट करा वर टॅप करा.
-आता चेकबॉक्सवर टिक करा आणि लोकेशन हिस्ट्री डिलीट करा.

गुगल मॅपचं फीचर सांगणार फ्लायओव्हर घ्यायचा की नाही
फ्लायओव्हरच्या माहितीअभावी लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते, असे अनेकवेळा घडते. परंतु आता असं होणार नाही. कारण गुगल मॅपवरील टेक फ्लायओव्हर फीचर फ्लायओव्हर येण्यापूर्वीच तुम्हाला माहिती देणार आहे. ज्यामुळे तुम्हाला कळते की आपल्याला पुढे कोणता फ्लायओव्हर घ्यावा लागेल.

याशिवाय मॅप अपडेट करताना गुगलने अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत, जे वापरकर्त्यांना ड्रायव्हिंग करताना खूप मदत करतील. गुगल मॅपची ही सुविधा अतिशय उपयुक्त आहे. हे थ्रीडी ग्राफिक्समध्ये स्पष्ट व्हिज्युअल प्रदान करते आणि ड्रायव्हरला कोणता फ्लायओव्हर घ्यावा लागेल, याबद्दल माहिती देते.

हेही वाचा :

आज ध्रुव योगासह बनले अनेक शुभ योग; 3 राशींना होणार दुप्पट लाभ

आमदाराच्या मुलाचं अपहरण, निर्वस्त्र करुन विवस्त्र महिलेसोबत फोटो काढले!

धनंजय महाडिकांची महिलांना भरसभेत धमकी; सतेज पाटलांकडून ‘कोल्हापूरी स्टाईल’ समाचार