इचलकरंजी, ३ ऑगस्ट २०२४: दि न्यू हायस्कूल, इचलकरंजी येथे साने गुरुजी(School) १२५ जयंती अभियान अंतर्गत आयोजित केलेले साने गुरुजींच्या जीवनगाथेचे पोस्टर प्रदर्शन आणि संवाद कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला. हा कार्यक्रम साने गुरुजींच्या विचारधारेचा प्रसार आणि विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या(School) प्रार्थनेने “खरा तो एकची धर्म” झाली. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांसमोर साने गुरुजींच्या जीवनातील विविध टप्प्यांचा संवाद साधण्यात आला. संवादक रोहित दळवी आणि वैभवी आढाव यांनी साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या प्रसिद्ध पुस्तकातील गोष्टींचा आधार घेत त्यांच्या बालपणातील आईकडून मिळालेल्या समतेच्या शिकवणीपासून ते विठ्ठल मंदिराच्या समतेच्या लढ्यापर्यंतच्या यशस्वी प्रवासाची कथा सादर केली.

साने गुरुजींच्या जीवनावर आधारित तयार करण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक बी. ए. कोळी सर, तराळ सर आणि इतर शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हे पोस्टर प्रदर्शन संपूर्ण दिवसभर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले होते. विद्यार्थी उत्सुकतेने आणि आदराने हे प्रदर्शन पाहत होते.
कार्यक्रमादरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक कोळी सर, तराळ सर, इतर शिक्षक स्टाफ आणि एकूण ५० विद्यार्थी मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. साने गुरुजींच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
हेही वाचा :
इचलकरंजी: खड्डे च खड्डे! पावसाळा संपला, पण मक्तेदार कुठे गायब?
बच्चू कडू आयत्या पिठावर नागोबा, नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो; रवि राणांनी डिवचलं