विधानसभा निवडणुकीच्या(political updates) अनुषंगाने राज्यात अनेक ठिकाणी सभा पार पडत आहेत. अशातच आता परांडा येथे आयोजीत केलेल्या महायुतीच्या सभेत भाजप नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.
परांडा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार (political updates)तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा परांडा येथे पार पडली आहे. या सभेत बोलताना कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनच्या दराबाबत शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं आहे.
सध्या सोयाबीन पिकाला भाव कमी आहे त्यामुळे तुमच्या मनात आमच्याबद्दल राग आहे. परंतु आता भाव कमी झाला म्हणून मी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना देखील भेटलो आहे. त्यामुळे आता येत्या 4 दिवसात तुम्हाला पाहिजे तसा सोयाबीनला भाव मिळणार असल्याचं वक्तव्य भाजप नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तानाजीराव सावंत यांच्या प्रेमापोटी हे लोक आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरसभेत व्यक्त केलं आहे. त्यामुळे ही तानाजी सावंत यांच्या विजयाची सभा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
तसेच तानाजी सावंत यांनी किल्ल्याची राखण हाती घेतली आहे, परंतु आता त्याला खूप दिवस झाले आहेत. त्यामुळे त्यांचा नाद करायचा नाही. तसेच तानाजीराव हे जादूगार आहेत आणि ते जादू करतात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हेही वाचा :
अमेरिकेत पुन्हा ट्रम्प कार्ड
सर्दी-खोकला झालाय? तुळशीचा चहा देईल आराम; जाणून घ्या सोपी रेसिपी
शाहूवाडीत सावकार विरुद्ध आबा मतदार संघावर कुणाचा ताबा!