एका झटक्यात डी-मार्टचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात(stock) बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. ज्यामुळे काही शेअरमध्ये घसरण तर काही शेअर्सने आपली घोडदौड कायम सुरु ठेवली आहे. अशातच आता रिटेल स्टोअर चेन डी-मार्ट चालवणारी कंपनी ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लि.बद्दल तुम्हाला माहिती आहेच.

सोमवारी शेअर बाजारात(stock) कंपनीच्या शेअर्सला चांगलाच फटका बसला आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) कंपनीचा शेअर्स 8.45 टक्क्यांनी घसरून, 4185.85 रुपये झाला आहे. अर्थात सोमवारी डी-मार्ट चालवणारी कंपनी ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लि.च्या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली आहे.

सोमवारी शेअर बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ६२२.३४ अंकांच्या उसळीसह ८२,००३.७० अंकांवर बंद झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी १८०.४५ अंकांच्या वाढीसह, २५,१४४.७० अंकांवर बंद झाला आहे.

दरम्यान, शेअर बाजारातील गेल्या सत्रात डीमार्टचे शेअर्स ४५७२.३५ रुपयांवर बंद झाले होते. स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीच्चांक 3618.85 रुपयांवर आहे. आणि उच्चांक 5484.0 रुपयांवर आहे. आज बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप 2,72,270.73 कोटी रुपये इतके दिसून आले आहे.

आज दुपारी 02:20 वाजेपर्यंत मुंबई शेअर बाजारात डी-मार्ट चालवणारी कंपनी ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या 1,14,780 शेअर्सचे व्यवहार झाले आहेत. सध्याच्या किमतीनुसार, शेअरने त्याच्या मागील 12 महिन्यांच्या ईपीएस 41.3 प्रति शेअरच्या 101.22 पट आणि त्याच्या पुस्तकी मूल्याच्या 15.76 पटीने व्यापार केला आहे. इक्विटीवर परतावा 13.56 रुपये होता.

30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने 14478.02 कोटींची एकत्रित विक्री नोंदवली आहे. जी एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहींच्या तुलनेत 14.35 टक्के अधिक आहे. कंपनीने ताज्या तिमाहीत 659.58 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात वार्षिक 5.78 टक्के वाढ नोंदवली आहे. दरम्यान, राधाकिशन एस. दमानी हे भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार, उद्योगपती आणि डी मार्टचे संस्थापक आहेत.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा:

उद्धव ठाकरेंना पुन्हा ह्रदयविकाराचा त्रास; रिलायन्स रुग्णालयात दाखल

प्रवाशांना मोठा दिलासा! एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द…

सणासुदीत सर्वसामान्यांना महागाई झटका; सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 1.84 टक्क्यांवर!