कोणाच्या डोळ्यात आसू तर कोणाच्या हाती वस्तरा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजकारणात कुणी धोका दिला तर नकळतपणे डोळ्याच्या कडा ओल्या होतात(razor). आणि कुणी सुखद धक्का दिला तर डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. राजकारणात विलक्षण इर्षा निर्माण झाली तर, ओठावर मिशी ठेवणार नाही अशी निर्वाणीची भाषा बोलली जाते. सध्या हाय होल्टेज निवडणूक ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये डोळ्यातले अश्रू आणि वस्तरा याचीच चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघातील निवडणूक वातावरण एका भावनिक पातळीवर येऊन पोहोचले आहे.

अजित दादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात बारामती लोकसभा मतदारसंघात लढत होत आहे(razor). त्या पवार घराण्याच्या बाहेरच्या आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केल्यानंतर सुनेत्रा पवार या भावनिक झाल्या होत्या. त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्याच्याही आधी अजितदादा पवार यांनी काही लोक अर्थात शरद पवार हे इथली निवडणूक भावनिक पातळीवर नेतील. कार्यकर्त्यांनी तिकडे लक्ष देऊ नये असे आवाहन केले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या उमेदवार असलेल्या पत्नी याच प्रचाराच्या दरम्यान भावनिक झाल्या होत्या.

‌ प्रचाराच्या अखेरीस आमदार रोहित पवार हे एका प्रचार सभेत अगदीच भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. त्यावर अजित दादा पवार यांनी रोहित पवार यांची नक्कल केली. रडीचा डाव राजकारणात चालत नाही. अशी खिल्ली त्यांनी उडवली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला तर ओठावर मिशी ठेवणार नाही अशी निर्वाणीची भाषा, इर्षेची भाषा अजित दादा पवार यांच्याकडून बोलली गेली होती. त्यावर आमदार रोहित पवार यांनी हातात वस्तरा घेऊन तयार राहा असे आव्हानच अजितदादा पवार यांना दिले आहे.

अजित दादा पवार यांच्या विषयी कोणी बोलले तर आमदार अमोल मिटकरी हे विना विलंब प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. त्यांनी रोहित पवार यांना बालिश म्हटले आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले म्हणून कोणी बुद्धिमान आणि प्रगल्भ राजकारणी होत नाही. केसाला डाय लावा, आणि मग बोला. तुमचा आणि बुद्धीचा काही संबंध आहे काय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

कोणाच्या डोळ्यात आसू तर कोणाच्या हाती वस्तरा

राजकारणात विशेषता निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या मध्ये चुरस निर्माण झाली, लढत अटीतटीच्या रिंगणात आली की, काही उमेदवार पैजा लावत असतात, आव्हान देत असतात, कोणी म्हणत मिशा कापून टाकीन, कोणी म्हणत डोक्यावर केस ठेवणार नाही, तर कोणी म्हणतं पायात चप्पल घालणार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात दोन मित्रांनी दोन एकर शेतीची पैज लावली होती. अर्थात ही पैज जिंकणाऱ्या मित्राने दोन एकर जमीन मित्राकडून घेतली नाही हा भाग वेगळा.

आता बारामती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात रोहित पवार हे भावनिक झाले, व्यासपीठावरच त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याच्या आधी सुनेत्रा पवार या भावनिक झाल्या होत्या. एका पदयात्रेच्या दरम्यान त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहिले होते. आता त्यांच्या अश्रूंचे रूपांतर मतामध्ये होईल का? अश्रूंची झाली मते? असे घडेल काय? याचे उत्तर दिनांक 4 जून रोजी मिळणार आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात पहिल्या दोन तासात दक्षिण, उत्तर आणि करवीर मतदारसंघात मतदानात चुरस!

सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी; महाराष्ट्राच्या राजकारणात….

सांगलीत पहिल्या चार तासात 16 टक्के मतदान; अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा