धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ …आता ओबीसी उतरले रस्त्यावर …

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एखाद्या निष्पाप व्यक्तीची हत्या झाली तर समाज मन हळहळ व्यक्त करतं. मारेकरांना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशा सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. तथापि काही (Politics news)राजकारण्यांनी या हत्या प्रकारात राजकारण आणले. त्या प्रत्यक्षपणे जातीयवाद आणला.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चे काढले जाऊ लागल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. दोन्हीकडून आप आपला छुपा अजेंडा राबवला जाऊ लागला आहे. मूळ विषय बाजूला पडून फक्त (Politics news)राजकारण केले जाऊ लागले आहे.

डिसेंबर 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात केज तालुक्याच्या मसाजोग गावचे लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांची एका किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आली. सात जणांच्या वर गुन्हा दाखल करून त्यांना आता काही करण्यात आली आहे. पण वाल्मीक कराड याचे संशयित आरोपी म्हणून मूळ फिर्यादीत नावच नाही.

पण हे संपूर्ण हत्या प्रकरण त्याच्याच भोवती फिरते आहे. त्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीशी निगडित असल्याचे तपासाचा निष्पन्न झाल्यानंतर, किंवा त्याच्याच सांगण्यावरून हत्या झाल्याचे पुराव्यासह स्पष्ट झाल्यावर,त्याला खंडणीच्या गुन्ह्यात मिळालेली पोलीस कोठडी संपल्यावर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अटक केली जाईल.

वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या खास वर्तुळातला. त्याच्याशिवाय मुंडे यांचे पान हलत नव्हते. एक प्रकारे तो त्यांचा वटमुखत्यार होता. त्यामुळे वाल्मिकी कराड याला वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल, म्हणून मग मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करा ही मागणी पुढे आली. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरले. खंडणी प्रकरण मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर घडले. तेथे मांडवली झाली. असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस हे धनंजय मुंडे यांचे स्पष्टपणे नाव घेत आहेत.

मुंडे यांना मंत्रीपदातून मुक्त करा ही एकमेव मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. ते मराठा समाजाचे आहेत पण जात मनात ठेवून ते या प्रकरणात उतरलेले नाहीत. याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी”सरपंच देशमुख यांच्या नातेवाईकांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर घरात घुसून मारले जाईल”असा इशारा दिला. सरपंच मराठा समाजाचे, सुरेश धस मराठा समाजाचे आणि जरांगे पाटील हे सुद्धा मराठा समाजाचे नेते. त्यामुळे हे मराठी धनंजय मुंडे यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला टार्गेट करत आहेत

अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांना आधी इशारा दिला आणि आता सुरेश धस यांना भारतीय जनता पक्षातून काढून टाका अशी मागणी पुढे करून बुधवारी ओबीसींचा छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा निघाला होता.

धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चे काढले गेल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ मोर्चे सुरू झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर चढवा पण कोणताही पुरावा नसताना मुंडे यांचा राजीनामा का मागता असा असावा ओबीसींकडून केला जाऊ लागला आहे. तर मुंडे हे मंत्रीपदावर राहिले तर त्या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास होणार नाही असा मुद्दा छत्रपती संभाजी राजे, सुरेश धस व इतरांनी उपस्थित केला आहे. एकूणच दोन्ही बाजूंकडून मुंडे हेच सध्या केंद्रस्थानी आहेत.


वास्तविक सरपंच हत्या प्रकरणातील सर्वच संशयित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कोणीही यात राजकारण न आणता तपास अधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे सहाय्य केले पाहिजे. पण इथे पोलिसांच्या वर दबाव टाकला जातो आहे. पोलिसांनी तपास कसा करावा याचे काहीजण पोलिसांनाच मार्गदर्शन करू लागले आहेत. पोलीस हे त्यांच्या पद्धतीने तपास करताना दिसतात. वाल्मीक कराड याच्याशी मैत्रीचे संबंध असणारे अनेक पोलीस व अधिकारी सध्या बीड जिल्ह्यात आहेत. त्यांच्याकडून निपक्षपाती तपासाची अपेक्षा करता येत नाही असा एक मुद्दा पुढे आणला गेला आहे. त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. पण इतक्या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करताना विकले गेलेले पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी यांना नक्कीच बाजूला ठेवले गेलेले असेल.

आता तर काही जणांच्या बदल्यां जिल्ह्याच्या बाहेर करण्यात आल्या आहेत.
सीआयडी, एस आय टी आणि न्यायिक या तीन माध्यमातून सरपंच हत्या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास सुरू आहे. त्यामुळे तपासाबद्दल कुणी शंका घ्यावी असे नाही.


संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या राजकीय हत्यार म्हणून वापर केला जाऊ लागला आहे . वाल्मीक कराड याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही असे खुद्द त्यांच्या भगिनी मंत्री पंकजा मुंडे यांनीच म्हटले आहे. एखाद्याने खंडणी तसेच हत्या असे गुन्हे केले असतील

तर तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कडून त्याच्या जवळच्या मित्रांची चौकशी केली जाते. ताब्यात घेतले जाते. हे सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात तपास अधिकाऱ्यांच्या कडून घडत असेल तर तोच न्याय त्यांनी इतरांनाही लावला पाहिजे. मग ती व्यक्ती कितीही मोठी असो. पण संशयित आरोपी कोण आहे? त्याची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे?
तो कोणाचा माणूस आहे?

त्याचे समाजकारणात आणि राजकारणात स्थान काय आहे? यावर पोलीस तपासा अवलंबून असतो. पोलिसांकडून समान न्याय मिळतो असे म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांना मंत्रीपदातून मुक्त करा अशी मागणी होऊ लागली आहे. अशी मागणी करण्यामागे काही जणांचे छुपे अजेंडे असू शकतात. पण त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जातात यामागेही जातीय राजकारण असू शकते.

हेही वाचा :

पक्षाला सोडून जाणारे कंस आणि रावणाचे वंशज…”; खासदार संजय राऊतांची गंभीर टीका

मसाज पार्लरमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांना खबर लागली अन्…

हो आपण गाफिल राहिलो म्हणूनच…; पवारांकडून जाहीर कबुली अन् …