ऐन विधानसभा निवडणुकीत पिकअपमधून मोठं गबाड हाती

विधानसभा(assembly) निवडणुकीच्या पार्श्वभूमी सुरू असलेल्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर कोट्यावधी रुपयांची चांदी सापडली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना पिकअपमधून चांदीची मोठ्या प्रमाणात वाहतूक मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून होत असल्याची पक्की खबर मिळाली होती.

या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, खोपोली पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवारी पहाटे खालापूर टोल नाका येथे सापळा रचला होता.

यावेळी पिकअप टेम्पो क्रमांक MH 01 EM 8775 पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सकाळी पावणे सातच्या दरम्यान खालापूर टोल नाक्यावर आला. तात्काळ दबा धरून बसलेल्या पोलिसांनी पिकअप ताब्यात घेत तपासणी केली असता त्यात कोट्यवधी रुपयांची चांदी असल्याचे उघडकीस आले. ताब्यात घेतलेलं वाहन खालापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पंचासमक्ष मालाची तपासणी करण्यात आली.

शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. जवळपास पाच ते सात कोटी रुपयांची चांदी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चांदी आणि मिठाई असे १७३ खोके वाहनात असल्याची माहिती प्रभारी निवडणूक अधिकारी ओंकार खामकर यांनी दिली आहे.

निवडणुकीच्या काळात राज्यातील पोलीस यंत्रणा अर्लट झाली असून प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणातील रोकड ऐन आचारसंहिता काळात कारवाई करुन पोलिसांकडून जप्त केल्या जात असल्याचे चित्र आहे.

पनवेल विधानसभा(assembly) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पथकाने पनवेलजवळ मोठी कारवाई केली. एसएसटी पथकाने शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे गोवा-पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या एका कारमधून सहा लाख रुपयांची रक्कम जप्त केली होती.

एसएसटी पथकाने पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे सकाळी ११.५५ वाजता गोवा-पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या राखाडी रंगाच्या टाटा पंच कारची थांबवून तपासणी केली असता, त्या गाडीमध्ये ६ लाखाची रोख रक्कम आढळून आली.

सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त करण्यात आली. ही कारवाई १८८ पनवेल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रायगड जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात २७ लाखाहून अधिक गुटखा, अंमली पदार्थ, तसेच दारू जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा :

टी20 नंतर आता कसोटी क्रिकेमटध्येही निवृत्तीची वेळ? रोहित शर्मा 8 पैकी 7 इनिंग्समध्ये फ्लॉप…

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी आघाडी?, संभाजीराजेंनी घेतील जरांगे पाटलांची भेट

अदानींच्या अंबुजा सिमेंटकडून विकत घेतली जाणार, देशातील ‘ही’ प्रमख सिमेंट कंपनी !