कोल्हापूर : अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे देश लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर(kolhapur) लोकसभा मतदारसंघासाठी आज (7 मे) मतदान होत आहे. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. कोल्हापूरमध्ये करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीचे संजय मंडलिक असा थेट सामना होत आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर(kolhapur) लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड, कागल आणि राधानगरी-भुदरगड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक चुरस कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चुरस दिसून येत आहे.
चंदगडमध्ये नऊ वाजेपर्यंत 5.60 टक्के मतदानाची नोंद झाली. कागलमध्ये 8.98 टक्के मतदानाची नोंद झाली. करवीरमध्ये 11.71 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 9.68 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर दक्षिणमध्ये 9.6 टक्के मतदानाची नोंद झाली. राधानगरीमध्ये सकाळच्या पहिल्या दोन तासात कमी प्रतिसाद लाभला असून 3.50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण उत्तर आणि करवीर मतदारसंघांमध्ये मतदारांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोल्हापूरमध्ये आजपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी सरासरी 70 टक्क्यांच्या घरामध्ये मतदान झालं आहे. त्यामुळे त्याच टक्क्यांमध्ये मतदान होण्यासाठी महायुती महाविकास आघाडीकडून झंझावती प्रचार झालाच आहे. त्याचबरोबर मतदारांना मतदानापर्यंत नेण्यासाठी सुद्धा प्रयत्नांची शर्थ केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा दणका चांगलाच वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम मतदानावर होत आहे. यासाठी 12 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान करून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. 12 वाजेपर्यंत मतदानानंतर पुन्हा तीन वाजल्यानंतर मतदानासाठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूरमध्ये 23 उमेदवार रिंगणात असले, तरी थेट लढत संजय मंडलिक आणि शाहू छत्रपती महाराज यांच्यामध्येच आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये काय होणार याकडे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंलगेच्या जागेवर कमालीचं लक्ष केंद्रित केलं आहे.
हेही वाचा :
शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
आमदार रोहित पवारांना तातडीने अटक करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
मोदींनी तुमच्या-आमच्या सारख्यांच्या खिशातून पैसा घेतला अन् अदानी, अंबानीला…