सततच्या पावसाने भाजीपाला महाग; चाकवत, पोकळा, तांदळी बाजारातून गायब

सलग आलेल्या मुसळधार पावसाने (rain)सातारा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले असून, भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे बाजारात चाकवत, पोकळा, तांदळी या पालेभाज्या जवळपास गायब झाल्या आहेत, तर मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर यांच्या जुड्यांचे दर आकाशाला भिडले आहेत. मिरची आणि घेवडा यांसारख्या फळभाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या सातत्याच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पालेभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतीतील अनेक भाजीपाल्याची उगवण थांबली असून, सडून गेल्यामुळे त्यांची आवक घटली आहे. बाजारात मेथीची जुडी ५० रुपये, शेपू ४० रुपये, पालक ३० रुपये, तर कोथिंबिरीचा दर ६० ते १०० रुपये इतका झाला आहे.

सध्या साताऱ्यातील बाजारपेठेत चाकवत, पोकळा, तांदळी अशा पालेभाज्या दिसेनाशा झाल्या आहेत. याशिवाय, टोमॅटो, मिरची, आणि घेवड्याच्या गुणवत्तेत घट झाल्यामुळे त्यांचे दरही वाढले आहेत. हिरवी मिरची सध्या ४० रुपये पावशेर दराने विकली जात आहे.

पावसामुळे पालेभाज्यांची उपलब्धता कमी झाल्यामुळे ग्राहकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या हवामानात सुधारणा झाली तरीही भाजीपाल्याचे दर लवकर कमी होण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा:

12 वर्षांपासून फक्त 30 मिनिटे झोपणारा युवक: तरीही आहे एकदम फीट , जाणून घ्या त्याचं रहस्य

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन: प्रवाशांचा खोळंबा, ५९ आगारांची सेवा ठप्प

कागलमध्ये शरद पवारांचा हल्लाबोल: ‘संकटकाळी सोडून गेलेल्यांचा हिशोब करायचा आहे’