विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना(Yojana) महायुती सरकारने सुरू केली. त्याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांनी या योजनेच्या रकमेत बदल करून 2100 रूपयांचा हप्ता दिला जाईल, असं आश्वासन दिला. निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली.
महिला मतदारांचं महायुतीच्या पारड्यात झुकतं माप होतं. त्यानंतर आता सर्व महिलांच्या मनात लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा सुधारित हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न आहे. यावर आता भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य समोर आलंय.
राज्यात 5 डिसेंबर रोजी नवं सरकार स्थापन होत आहे. लाडकी बहीण योजनेचा(Yojana) हप्ता 2100 रूपये केव्हापासून होणार? यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार हे आश्वासन निवडणुकीच्यावेळी देण्यात आले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
सुधीर मुनगंटीवार या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिणार आहेत. आम्ही आश्वासन धूळीस मिळू देणार नाही. अन्यथा आमची संपूर्ण देशात प्रतिमा खराब होईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो, असं देखील मुनगंटीवार म्हणाले आहेत.
जानेवारी की जुलै? नेमक्या कोणत्या महिन्यापासून योजनेचा हप्त्यात वाढ करून 2100 रूपये द्यायचे, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मागील वर्षी भाऊबीजेच्या दिवशी आम्ही ही योजना सुरू केली होती. त्यामुळे पुढील वर्षी या योजनेच्या रकमेत वाढ होवू शकते, असे संकेत देखील त्यांच्याकडून मिळाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जनतेला वारेमाप आश्वासन देण्यात आली होती. महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याशिवाय त्यांनी योजनेचं नाव महालक्षी योजना करणार असं देखील सांगितलं होतं. तर महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून 1500 वरुन 2100 करु, असे आश्वासन दिलं होतं. दरम्यान, आता वाढीव रक्कम देण्यासंदर्भात भाजपचे जेष्ठ नाते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संकेत दिले आहेत.
हेही वाचा :
राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींना महिलांना मिळणार नाहीत पैसे
“पैशांसाठी मी लोकांसोबत…”, ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीने स्वतः दिली देहविक्रीची कबुली!
थेट 800 फुटांच्या नागफणी कड्यावरून अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी